भारतातील महिलांमध्ये वाढतेय अंडाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण! काय त्यामागची कारणं- लक्षणं कशी ओळखायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 18:47 IST2025-04-16T09:11:49+5:302025-04-16T18:47:16+5:30

भारतातील महिलांमध्ये अंडशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले असून वर्षभरात १ लाखांपेक्षाही जास्त केसेस समोर येत आहेत..

बदललेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सर या आजाराचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.

यातही महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर भारतामध्ये महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्या खालोखाल स्तनांचा कॅन्सर असून क्रमांक तीनवर अंडाशयाचा कॅन्सर म्हणजेच ओव्हेरियन कॅन्सर आहे.

वारंवार अपचन होणे, ओटीपोटात दुखणे, भूक मंदावणे, बद्धकोष्ठता, अशी या आजाराची लक्षणे आहेत. असे काही त्रास जर तुम्हाला अचानकपणे सुरू झाले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

हा कॅन्सर रक्ताच्या नात्यातल्या एखाद्या महिलेला झाला असल्यास हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. तसेच जर कुटूंबातील महिलांना स्तन, गर्भाशय, मोठे आतडे, मलाशय यांचे कॅन्सर झाले असतील तरीही हा आजार होण्याचा धोका वाढतो.

झी न्यूज यांनी दिलेल्या वृत्तानुसार अंडाशय किंवा ओव्हेरियन कॅन्सर या संदर्भात दिल्ली येथील AIIMS संस्थेत जो अभ्यास करण्यात आला त्यानुसार पेल्विस भागात असणारा एक लिम्फ नोड काढल्यास या आजारातून बरे होण्याची शक्यता जास्त बळावते. संस्थेने दिलेला हा अहवाल कॅन्सर इंस्टिट्यूट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.