Celebrity Diwali Look : कियारापासून करिश्मापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींचा स्टनिंग दिवाळी लूक; पाहा हटके फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 12:12 PM2022-10-24T12:12:48+5:302022-10-24T12:31:43+5:30

Celebrity Diwali Look : या लेखात बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास निवडक फेस्टिव्ह लूक्स पाहूया.

सेलिब्रिटी आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. (Celebrity Diwali Dressing) दिवाळीला आपल्या आवडत्या तारकांनी कोणते आऊटफिट्स कॅरी केले याचे सर्वांनाच आकर्षण असते. या लेखात बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास निवडक फेस्टिव्ह लूक्स पाहूया.

सिंगल स्ट्रीप ब्लाऊज सह गोल्डन साडीमध्ये कियारा अडवाणी खूपच आकर्षक दिसत आहे. दागिन्यांशिवाय तिचा लूक अगदी परिपूर्ण वाटत आहे.

कृती सेननं पांढरी साडी आगळ्यावेगळ्या स्टाईलनं कॅरी केली आहे. ट्यूब स्टाईल ब्लाऊज या साडीवर तिनं निवडलं.

अनन्या पांडेच्या सिंपल लेहेंगा लूकनं सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं. लेहेंग्यावरच फ्लोरल प्रिटिंग अनेकांना आवडलं. यावेळी तिनं मोजडी घालणं पसंत केलं.

सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती गोल्डन ब्लाऊज आणि गोल्डन पॅचेचच्या साडीवर दिसून आली.

करिश्मा दिवाळी लूकमध्ये मरून साडीत झळकली होती.

(Image Credit- Social Media)