घटस्फोटानंतरही ‘फक्त मुलांसाठी’ कायम प्रेमानं एकत्र येणारे सेलिब्रिटी आईबाबा, मोडलेल्या संसाराची ‘अशी’ही गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 03:04 PM2024-11-11T15:04:18+5:302024-11-11T17:18:03+5:30

Celebrity Exes Who Successfully Coparent Together : को पॅरेण्टिंग नावाची संकल्पना घटस्फोटानंतरही जपणारे सेलिब्रिटी पालक

नवरा बायको घटस्फोट घेऊ शकतात (Husband - Wife). पण आईबाबांचं काय? (Parents) नताशा, हार्दिक पांड्याची पूर्व पत्नी तेच म्हणाली की मी का देश सोडून जाईन? (Parenting Tips) इथे माझ्या मुलाचं कुटूंब आहे, शाळा आहे. वडील आहेत. त्याला आम्हा दोघांची गरज आहे(Celebrity Exes Who Successfully Coparent Together).

घटस्फोटानंतर आईवडिलांनी एकमेकांशी किमान समन्वय राखत कटूता कमी केली तर ते मुलांसाठी सोपं होतं.

पाश्चिमात्य जगात या संकल्पनेला को पॅरेण्टिंग म्हणतात. म्हणजे विभक्त झाल्यानंतरही पालक म्हणून मुलांच्या विकासात, वाढीत सहभागी असणं त्यासाठी काळजी घेणं.

आपण बरेच सेलिब्रिटी पालक पाहिले असतील जे, विभक्त झाल्यानंतरही मुलांसाठी एकत्र येतात. यालाच को - पॅरेण्टिंग म्हणतात.

को - पॅरेण्टिंग सध्या ट्रेण्डमध्ये आहे. ऋतिक रोशन - सुझेन, हार्दिक पांड्या - नताशा आणि सोहेल खान व त्याची एक्स वाईफ सीमा सजदेह त्याआधीही आमीर खान, गौरी आणि किरण राव, फरहान आणि अधुना, अरबाज आणि मलायका अरोरा हे आपल्या मुलांसोबत दिसतात. बाहेर फिरतात. पिकनिकलाही जातात.

सोहेल खानशी घटस्फोट घेतल्यानंतर सीमा सजदेह सांगते, आम्ही मुलांना लहानपणापासूनच काही नितीमूल्यं शिकवली आहेत. संस्कार करण्याची जबाबदारी दोन्ही पालकांची आहे. आताही मुलांसाठी योग्यवेळी आम्ही एकत्र येऊन निर्णय घेतोच. मुलांना नेहमीच पालकांची गरज असते. विभक्त झाल्यानंतरही! मुलांना हे समजले पाहिजे की त्यांचे पालक नेहमीच त्यांच्यासोबत असतात. त्यांचा आनंद हीच आमची प्रायोरिटी आहे. आमच्यासाठी दोन्ही मुलं हीच पहिली प्रायोरिटी आहे.

आमीर खान आणि गौरी लेकीच्या लग्नात एकत्र होते. त्यावेळी त्याची दुसरी पत्नी किरण रावही हजर होती. अत्यंत आनंदाने त्यांनी एक वेगळं कुटूंब तयार केलं आहे.

ऋतिक रोशन आणि त्याची पूर्व पत्नी आणि मुलं एकत्र सेलिब्रेट करताना दिसतात. ऋतिकची नवीन मैत्रीणही सोबत असते.

फरहान अख्तर तर सांगतोच की त्याच्या मुलींसाठी आईवडिलांचा घटस्फोट त्रासदायकच होता पण त्यातून त्यांना सावरणंही पालक म्हणून गरजेचं होतं,

लग्न मोडतं, नात्यात कटूता येते. पण आईवडिल म्हणून मुलांसाठी उपलब्ध असणं आणि त्यांचं आयुष्य सोपं करणं, त्यांना साेबत करणं हे ही तितकंच महत्त्वाचं आहे.