celebrity fashion designer who design all the lehenga of ambani ladies for anant radhika wedding
नीता अंबांनीपासून राधिकापर्यंत सगळ्यांचे कमालीचे सुंदर लेहेंगे कुणी डिझाइन केले? पाहा एकसेएक ड्रेस By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 01:39 PM2024-07-13T13:39:52+5:302024-07-13T16:06:45+5:30Join usJoin usNext लग्नसोहळ्याप्रसंगी राधिका मर्चंटने हा सुंदर लेहेंगा घातला होता. गुजराती परंपरेनुसार नवरी लग्नात पनेतर साडी नेसते. त्यानुसारच या लेहेंग्याचं डिझाईन केलं होतं. यावर तिने टिशू सिल्कची ओढणी घेतली होती आणि संपूर्ण लेहेंग्यावर वेगवेगळे स्टोन, सेक्विन, तांबा टिक्की लावून रेशमाने भरगच्च जरीकाम केलेलं होतं. तिचा घागरा अबू जानी संदीप खाेसला यांनी डिझाईन केला होता. इशा अंबानीने लग्नासाठी अतिशय भरगच्च वर्क असणाऱ्या पेस्टल रंगाच्या घागऱ्याची निवड केली होती. तिचा घागरा सुद्धा अबू जानी संदीप खाेसला यांनी डिझाईन केला होता. या घागऱ्याचं ब्लाऊज स्वरोस्की हिरे लावून डिझाईन करण्यात आलं होतं. या ड्रेसवर इशाने ठसठशीत असा चमचमत्या हिऱ्यांचा नेकलेस घातला होता. अनंत- राधिकाच्या लग्नाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नीता अंबानी यांचे सगळेच लूक अतिशय देखणे होते. त्यामुळे लग्नप्रसंगी त्या काय घालणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले. त्यांनी देखील अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला घागरा घातला होता. या घागऱ्यावर ब्राँझ, गुलाबी, पिस्ता असे वेगवेगळे पेस्टल रंग वापरण्यात आले होते. सोन्या, चांदीच्या धाग्यांचं जर्दोसी वर्क आणि त्यावर लावण्यात आलेले स्वरोस्की हिरे ही त्यांच्या लेहेंग्याची खासियत होती. अंबांनी परिवाराची मोठी सून श्लोका मेहता हिने तिच्या लग्नातलाच लेहेंगा अनंत- राधिकाच्या लग्नासाठी निवडला होता. तिची बहिणी आणि स्टायलिस्ट दिया मेहता हिने श्लोकाचा लूक डिझाईन केला होता. स्टोन, मिरर वर्क असणाऱ्या तिच्या लेहेंग्यावर तिने सगळे हिऱ्यांचे दागिने घातले होते. तिचा लेहेंगाही अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केला होता... म्हणजेच काय तर अनंत- राधिकाच्या लग्नासाठी अंबानी परिवारातल्या सगळ्याच महिलांनी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेले कपडे घातले होते.. टॅग्स :फॅशनलग्ननीता अंबानीईशा अंबानीfashionmarriagenita ambaniIsha Ambani