कपड्यांपासून फर्निचरपर्यंत... सगळं घर होईल चकाचक, बघा घराच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगरचे ६ भन्नाट उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2023 01:52 PM2023-01-13T13:52:33+5:302023-01-13T14:01:54+5:30

१. व्हाईट व्हिनेगर (white vinegar) खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जातं, हे तर आपल्याला माहिती आहेच. पण त्याशिवायही घराच्या स्वच्छतेसाठी (white vinegar for cleaning purpose) त्याचा खूप चांगला उपयोग होतो.

२. घरातल्या वेगवेगळ्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी व्हाईट व्हिनेगर कसं उपयोगी ठरतं, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या homehacksco या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

३. पांढरे कपडे अधिक स्वच्छ निघण्यासाठी आणि कपड्यांना मऊपणा येण्यासाठी व्हिनेगर वापरता येतं. दुसरं कोणतंही क्लॉथ सॉफ्टनर किंवा क्लॉथ कंडिशनर वापरण्यापेक्षा व्हिनेगर वापरल्याने अधिक चांगला परिणाम दिसून येतो.

४. फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलेली फुलं अधिक दिवस फ्रेश रहावीत यासाठी फुले ज्या पाण्यात ठेवली असतील त्यात थोडे व्हिनेगर टाका. फुले टवटवीत दिसतील.

५. डिश वॉशर स्वच्छ करण्यासाठीही व्हाईट व्हिनेगरचा उपयोग होतो. यासाठी २ कप व्हिनेगर एका भांड्यात घालून ते भांडे इतर भांड्यांसोबत डिशवॉशरमध्ये ठेवा आणि ते वॉशर सुरू करा.

६. आरसा किंवा खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर अतिशय उपयुक्त ठरतं.

७. फर्निचरची चमक कमी झाल्यासारखी वाटत असेल तर व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑईल १: ३ या प्रमाणात घ्या आणि त्याने फर्निचर स्वच्छ करा. फर्निचर पुन्हा नव्यासारखे चमकेल.

८. बुटांवर पडलेले डाग स्वच्छ करण्यासाठीही व्हिनेगरचा उपयोग होतो. डागांवर थोडे व्हिनेगर टाका आणि कपड्याने पुसून घ्या. डाग स्वच्छ होतील.