नवरात्र स्पेशल: काळे पडलेले ऑक्सिडाइज्ड दागिने चमकतील नव्यासारखे, घ्या ६ टिप्स- गरब्यासाठी व्हा रेडी... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 05:10 PM 2024-09-27T17:10:49+5:30 2024-10-01T07:29:26+5:30
How to clean oxidized jewellery at home : Cleaning Oxidised Jewellery At Home : How To Clean Oxidised Jewellery Easily: Simple Methods For How To Clean Oxidised Jewellery At Home : वापरात नसलेले ऑक्सिडाईज दागिने काळे पडतात. त्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी करून बघा हे सोपे उपाय... शारदीय नवरात्रौत्सव (Navratri 2024) सुरु होण्यास आता फक्त काही दिवसचं बाकी आहेत. नवरात्र उत्सवाची तयारी सगळ्यांच्या घरी अगदी जोरदार सुरु असेल. नवरात्रात गरबा खेळण्याची मजा काही औरच असते. गरबा खेळायला जाताना सगळ्याचजणी अतिशय नटून - थटून जातात. मोठमोठाले घेरदार घागरे, त्यावर सूट होईल अशी हेअरस्टाईल, यासोबतच मेकअप आणि सर्वात महत्वाच म्हणजे ऑक्सिडाइज्ड दागिने. रंगीबेरंगी घागरा घातल्यानंतर त्यावर शोभून दिसेल अशी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातल्याने आपला गरबा लूक पूर्ण होतो. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी काहीवेळा ठेवून ठेवून खूप काळी पडते अशावेळी ही ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठीच्या काही सोप्या टिप्स समजून घेऊयात. या सोप्या टिप्सचा वापर करून आपण आपली काळी पडलेली ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी पुन्हा नव्यासारखी करु शकता(How To Clean Oxidised Jewellery Easily).
१. बेकिंग सोडा :- एका भांड्यात थोडे गरम पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घाला आणि चांगले मिक्स करा. आता त्यात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ५ मिनिटे बुडवून ठेवा त्यानंतर हलकेच घासून ज्वेलरी स्वच्छ करा.
२. व्हिनेगर :- एका भांड्यात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी ठेवून त्यावर व्हिनेगर ओतावे. या व्हिनेगरमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी १५ मिनिटांसाठी बुडवून तशीच ठेवून द्यावी. त्यानंतर ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी बाहेर काढून स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यावी.
३. गोळ्यांचे रॅपर्स :- एका भांड्यात गोळ्यांचे रॅपर्स किंवा कव्हर टाका. त्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला. याच भांड्यात तुमचे काळवंडलेले ऑक्सिडाईज दागिने ठेवून द्या. आणि त्यावर कडक गरम पाणी ओता. दागिने व्यवस्थित पाण्यात भिजले जातील एवढं पाणी असावं. एखादा चमचा वापरून दागिने, पाणी वर- खाली करत राहा. पाणी काेमट झालं की दागिने भांड्यातून बाहेर काढून घ्या आणि स्वच्छ कपड्याने पुसून काढा. दागिन्यांचा काळेपणा कमी झालेला असेल.
४. कोरडी टूथ पावडर किंवा टूथपेस्ट :- कोरडी टूथ पावडर या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीवर थेट घालून मऊ कापडाने दागिने स्वच्छ पुसून घेतल्याने देखील हे दागिने पुन्हा नव्यासारखे चमकू लागतील. ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची चमक टिकवून ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे टूथपेस्ट वापरणे. यासाठी दागिन्यांवर पांढरी टूथपेस्ट लावा आणि कोमट पाण्याने धुवा.
५. टोमॅटो व टोमॅटो केचअप :- एका बाऊलमध्ये टोमॅटो केचअप घेऊन त्यात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी १० मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर एक जुना ब्रश घेऊन हे दागिने हलकेच घासून घ्यावेत यामुळे दागिने स्वच्छ होतात. टोमॅटोमध्ये असलेले ऍसिड ऑक्सिडाइज्ड दागिने नव्यासारखे करण्यास मदत करतात. एका वाटीमध्ये टोमॅटोचा रस २ टेबलस्पून घ्या. त्यात २ टीस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण दागिन्यांवर लावा आणि दागिने स्वच्छ करा. त्यानंतर ते स्वच्छ पुसून पुर्णपणे कोरडे करा
६. लिंबाचा रस आणि मीठ :- लिंबाचा रस आणि मीठ समप्रमाणात घेऊन त्याचे एकत्रित लिक्विड तयार करून घ्यावे. आता एक कॉटनचे कापड घेऊन हे कापड त्या द्रावणात बुडवून त्याने हे ऑक्सिडाइज्ड दागिने पुसून घ्यावे. यामुळे ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची हरवलेली चमक पुन्हा येईल.