१ चमचा खोबरेल तेलात मिसळा ‘या’ ५ पैकी १ पदार्थ, तुमचं तारुण्य परत आणणारी जादूई युक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 15:17 IST2025-04-14T15:09:10+5:302025-04-14T15:17:46+5:30
5 Coconut Oil Hacks for Clear & Glowing Skin : Coconut Oil Uses That Benefit Your Hair and Skin : coconut oil cures for your skin and hair : चमचाभर खोबरेल तेलात ५ नैसर्गिक पदार्थ मिसळा आणि पाहा जादू - महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स जाल विसरून...

आपल्या सगळ्यांच्याच घरात खोबरेल तेल हमखास वापरलं जात. प्रामुख्याने खोबरेल तेलाचा वापर आपण केसांसाठीच करतो. परंतु खोबरेल तेलाचा वापर फक्त केसांपुरताच न करता, इतरही गोष्टींसाठीही वापरून आपल्या सौंदर्यात अधिक भर पाडू शकतो.
चमचाभर खोबरेल तेलात काही नैसर्गिक पदार्थ मिसळून दातांच्या स्वच्छतेपासून - त्वचेसाठी अनेक पद्धतींनी वापरु शकतो.
इंस्टाग्राम वरील rohitsachdeva1 या अकाउंटवरून खोबरेल तेलाच्या मदतीने, आपल्या सौंदर्यात कशी भर पाडू शकतो याचे सिक्रेट शेअर केले आहे.
१. चमचाभर खोबरेल तेलात १/२ टेबलस्पून हळद मिसळून या मिश्रणाने दात घासावेत. यामुळे दातांचा पिवळेपणा नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होते.
२. खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळून, याने केसांना मसाज केल्यास केसगळती थांबण्यास अधिक मदत होते. याचबरोबर, केसांची जलद गतीने वाढ होण्यास फायदेशीर ठरते.
३. चमचाभर बेकिंग सोडा खोबरेल तेलात मिक्स करावा. हे तयार मिश्रण, काळपट झालेले कोपर, मान, गुडघ्यांवर लावून मसाज केल्याने त्वचेवरील काळपटपणा दूर होतो.
४. १ टेबलस्पून कॉफी खोबरेल तेलात मिसळून घ्या. हे मिश्रण डोळ्यांखालील डार्क सर्कल्सवर लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. याचबरोबर, डोळ्यांजवळील वृधत्वाच्या खुणा देखील घालवण्यास मदत होते.
५. खोबरेल तेलात १ टेबलस्पून साखर मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचेचे उत्तम स्क्रबिंग केले जाते. या मिश्रणाने त्वचेचे स्क्रबिंग केल्याने डेड स्किन निघून जाउन त्वचेवर ग्लो येतो.