सतत मान दुखते? खांदादुखीने त्रस्त आहात? ८ उपाय, त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 12:09 PM2022-12-15T12:09:24+5:302022-12-15T12:21:24+5:30

Neck Shoulder Pain Home Remedy कायम मान दुखत असेल किंवा खांदा दुखत असेल तर डॉक्टरांचाच सल्ला घ्यायला हवा, त्यापूर्वी आपण काही गोष्टी लाइफस्टाइल म्हणून बदलता येतील.

बहुतांश लोकांना सकाळी उठल्यानंतर मानेचं आणि खांद्याच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. उसण भरण्याची कारणं अनेक असू शकतात. जर, झोपण्याची स्थिती नकळत बिघडली असेल अथवा लचक भरली असेल तर, अशी समस्या उद्भवणे सामान्य आहे. मानेवर आणि खांद्याला जर चमक भरली तर जास्त हलता डुलता येत नाही. अशावेळी काय करायचं? सर गंगाराम हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागाचे संचालक डॉ. सतनाम सिंग छाबरा म्हणतात, "खेळ, अतिश्रम आणि चुकीचे पोश्चर ही मान आणि खांदेदुखीची काॅमन कारणे आहेत. गाद्या, उशा आणि झोपण्याच्या स्थिती बदलली की मानेवर, खांद्यावर आणि मणक्यावर ताण पडतो''. मग हा त्रास होवू नये म्हणून काय करावे?

मानेला आणि खांद्याला चमक भरली असेल तर, दुखण्याच्या जागेवर आईस पॅक ठेवा. १० ते १५ मिनिटे आईस पॅकने शेक दिल्यानंतर काहीसा आपल्याला आराम मिळेल. ही प्रक्रिया दुखणे कमी होईपर्यंत करा.

दुखत असलेल्या ठिकाणी म्हणजेच मान आणि खांद्यावर हिट पॅक ठेवा. हिट पॅकचा शेक दिल्याने आपल्याला आराम तर मिळेलच यासह मसल्सचा रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळेल.

झोपून उठल्यानंतर जर चमक भरली असेल तर, त्या जागी मोहरी किंवा लव्हेंडरच्या तेलाने मसाज करा. या तेलाने मसाज केल्याने अवयवांना बराच आराम मिळतो.

चमक भरलेली जागा वेदनादायी ठरत असेल, तर त्याजागी गरम पाण्याचा शेक द्या. असे केल्याने त्वरित आराम मिळेल.

दुखण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आले मधात मिसळून सेवन करा. याचे सेवन केल्याने आपल्याला खूप आराम मिळेल.

कोणत्याही प्रकारच्या वेदना दूर करण्यासाठी रॉक मीठ खूप फायदेशीर आहे. अशा स्थितीत कोमट पाण्यात रॉक सॉल्ट टाकून दुखणाऱ्या जागी चोळल्यास वेदना कमी होतात.

मानेच्या आणि खांद्याच्या दुखण्यापासून आराम हवा असेल तर, योग करणे उत्तम ठरेल. योग केल्याने अनेक आजार आणि दुखणे दूर होतात.

व्यायामाच्या मदतीने आपण मानेचे स्नायू मजबूत करू शकता. यासाठी दररोज मान ताणून सरळ उभे राहा. मान सर्व बाजूने फिरवा. ही प्रक्रिया किमान ५ वेळा करा. असे केल्याने मानदुखीपासून सुटका होईल