न्यूडल्स करताना चिकट -लगदा होतो? ६ टिप्स, होतील मऊ- सुटसुटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 18:47 IST2025-04-10T18:36:23+5:302025-04-10T18:47:17+5:30
How to boil noodles without sticking: Why noodles get mushy: Perfect noodle boiling tips: Non-sticky noodles cooking method: अनेकदा न्यूडल्स बनवताना त्यात पाणी जास्त होते, चिकट होतात किंवा त्याचा लगदा होतो ज्यामुळे ते खावेसे वाटत नाही

आपल्यापैकी अनेकांना न्यूडल्स खायला अधिक आवडते. रेडी टू- कूकपासून ते २ मिनिटांत इन्स्टंट तयार होणारा हा न्यूडल्स सगळ्यांचा आवडीचा प्रकार. चायनीज हॉटेलमध्ये न्यूडल्सची चव चाखल्यानंतर आपल्याला देखील ते घरी एकदा ट्राय करावेसे वाटतात. (Boiling noodles hacks)
अनेकदा न्यूडल्स बनवताना त्यात पाणी जास्त होते, चिकट होतात किंवा त्याचा लगदा होतो ज्यामुळे ते खावेसे वाटत नाही. करताना काहीतरी चुकलं की न्यूडल्सची चव बिघडते. जर आपल्यासोबत देखील न्यूडल्स बनवताना असे होत असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (Noodle cooking mistakes to avoid)
न्यूडल्स बनवताना अनेकदा आपण पाणी गरम करायला ठेवतो आणि थंड पाण्यातच न्यूडल्स टाकतो. ज्यामुळे ते चिकट होतात किंवा जास्त प्रमाणात शिजतात. नेहमी न्यूडल्स बनवताना पाण्याला उकळी आली की, मग घाला. यामुळे ते सुटसुटीत होतील.
पाण्यात उकळत ठेवले की, मीठ घाला. यामुळे न्यूडल्सला वेगळी चव येते. मीठ न घालता शिजवले की न्यूडल्स फारसे रुचकर बनत नाही.
पाण्यात उकळत ठेवले की, मीठ घाला. यामुळे न्यूडल्सला वेगळी चव येते. मीठ न घालता शिजवले की न्यूडल्स फारसे रुचकर बनत नाही.
अनेकदा न्यूडल्स सुटसुटीत व्हावा यासाठी आपण पाण्यात तेल घालतो परंतु, असे केल्याने सॉस न्यूडल्समध्ये नीट मिक्स होत नाही. ज्यामुळे ते खाताना अधिक चविष्ट लागत नाही.
न्यूडल्स जास्त प्रमाणात शिजवले की ते मऊ आणि चव नसलेले बनतात. ज्यामुळे खाताना अगदी त्याची चव बदलते. चिकट किंवा लगदा खाल्ल्यासारखे होते. त्यासाठी थोडे अर्धे शिजलेला न्यूडल्स वापरावा.
न्यूडल्स उकळलेले पाणी फेकून नका. सॉस बनवताना या पाण्याचा वापर करा. त्यामुळे सॉस अधिक चविष्ट बनतो. न्यूडल्स आणि सॉस वेगळ्या पद्धतीने शिजवू नका. अनेकदा आपण वेगळ्या पद्धतीने शिजवून नंतर ते एकत्र करतो ज्यामुळे त्याची चव बिघडते. न्यूडल्स शिजल्यानंतर सॉसमध्ये घालून चांगले एकजीव करा. ज्यामुळे त्याची चव अधिक वाढते.