टोमॅटो खाण्याची योग्य पद्धत- एक्सपर्ट सांगतात 'या' पद्धतीने टोमॅटो खाल्ल्यास मिळतील भरपूर फायदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 17:03 IST2025-01-15T16:58:43+5:302025-01-15T17:03:48+5:30

टोमॅटो आपल्या खाण्यात नेहमीच असतो. कधी एखाद्या भाजीच्या स्वरुपात तर कधी वरण, चटणी, सूप, सलाड, कोशिंबीर या माध्यमातूनही तो खाल्ला जातो.(correct method of eating tomato)
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, फोलेट हे देखील भरपूर प्रमाणात असतं.
त्याचबरोबर टोमॅटोमध्ये लायकोपीन हे ॲण्टीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. पण त्याचा लाभ हृदयाला तेव्हाच होतो जेव्हा ते लायकोपीन आपल्या रक्तात पुरेपूर शोषून घेतलं जातं. त्यासाठी टोमॅटो नेमके कोणत्या पद्धतीने खायला हवे, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडीओ आहारतज्ज्ञांनी superfoods.by.eatbreathesmile या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
त्यामध्ये एक्सपर्ट असं सांगत आहेत की जेव्हा तुम्ही कच्चा टोमॅटो सलाडच्या स्वरुपात खाणार असाल तेव्हा टोमॅटोच्या फोडींवर थोडं ऑलिव्ह ऑईल टाका आणि त्यानंतर ते खा.
कारण ऑलिव्ह ऑईलमध्ये असे काही घटक असतात जे टोमॅटोमधल्या लायकोपीनचा जास्तीतजास्त फायदा शरीराला मिळवून देतात.
टोमॅटोची कोशिंबीर करताना त्यात फोडणी घातलीच जाते. त्या फोडणीमध्ये इतर कोणतं तेल वापरण्यापेक्षा ऑलिव्ह ऑईल वापरल्यास अधिक चांगलं.