रोज सकाळी प्या एक ग्लास जिरे आणि बडीशेपेचे पाणी, तुमची तब्येत कशी जादू झाल्यासारखी सुधारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 19:25 IST2025-02-26T19:07:57+5:302025-02-26T19:25:17+5:30

Cumin And Shauf Water For Better Health : शरीरासाठी फार चांगले आहे हे पाणी. तयार करायलाही सोपे.

सतत काही ना काही किडुकमिडुक त्रास प्रत्येकाला होतच असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले की ते वाढतात.

पण मग त्यावर उपाय करायचे तरी काय? सारखे तर डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही. मग अशावेळी घरगुती उपायच कामी येतात.

रोज सकाळी एक ग्लास जिरं व बडीशेपचं पाणी प्यायल्याने अशा सतत उद्धवणाऱ्या किरकोळ आजारांना राम-राम ठोकता येतो.

जिरं - बडीशेपेचे पाणी रोज सकाळी उठल्या-उठल्या प्यायल्याचे अनेक उपयोग आहे.

या पाण्याच्या वापरामुळे शरीराला भरपूर अँन्टीऑक्सीडंट मिळतात. तसेच जीवनसत्त्व सी ही भरपूर मिळते. तसेच दिवसभरासाठी शरीराला ऊर्जा मिळते.

ज्यांना सतत उष्णतेचा त्रास होतो. पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे पाणी अत्यंत गुणकारी आहे.

हे पाणी वजन कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरते. मेटाबॉलिझम चांगले राहण्यासाठी हे पाणी मदत करते.

त्वचाही अत्यंत चांगली राहते. शरीराला गरजेचा असलेला थंडावा शरीराला मिळतो. त्यामुळे उष्णतेचे फोड वगैरे येत नाहीत.