उन्हाळ्यात ५ प्रकारे दही खा; पोट, मांड्यांवरची चरबी पटापट होईल कमी, पचनाचे विकार होतील दूर By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:09 PM 2023-04-16T12:09:56+5:30 2023-04-16T12:19:11+5:30
Curd for weight loss how to eat : वजन कमी करण्यासाठी दही आणि तांदूळ यांचे मिश्रण देखील खूप प्रभावी ठरू शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही भातामध्ये दही मिसळून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला खूप फरक दिसेल. उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करतात. दही खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. दही शरीरासाठी एखाद्या फॅट बर्नरप्रमाणे काम करते. वजन कमी करण्यासाठी दह्याचे सेवन कसे फायदेशीर ठरते याबाबत समजून घेऊया.
दही फॅट बर्नर म्हणून काम करते. दह्यात प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवतात आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात. जेव्हा चयापचय योग्यरित्या कार्य करते तेव्हा ते वजन कमी करण्यास मदत होते. रोज दही खाल्ल्याने तुम्ही तुमचा बीएमआय नियंत्रणात ठेवू शकता. याशिवाय दह्यामध्ये प्रोटीन देखील असते, ज्यामुळे तुमचे पोट लवकर भरते आणि तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.
प्लेन दही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात साध्या दह्याचा समावेश करू शकता. यासाठी एक वाटी दही घ्या. हे सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणासोबत खा. यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळाल आणि हळूहळू तुमचे वजन कमी होईल.
दही आणि ड्राय फ्रुट्स दही अधिक हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही त्यात चिरलेले ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. दह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातल्याने ते अधिक पौष्टिक बनते आणि शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्त्वे मिळतील. हे कॉम्बिनेशन खाल्ल्याने तुमचे बराच काळ पोट भरलेले राहील आणि वजन कमी होण्यास मदत होईल.
दही पराठे बहुतेक लोकांना चटणी किंवा चहासोबत पराठे खायला आवडतात. तुम्ही दह्यासोबत पराठेही खाऊ शकता. पराठासोबत दही खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.
दही आणि काळी मिरी जर तुम्हाला साधे दही आवडत नसेल तर तुम्ही त्यात काळी मिरी घालून खाऊ शकता. यासाठी एक वाटी दही घ्या, त्यात काळी मिरी पावडर घाला. आता सेवन करा. दही आणि काळी मिरी दोन्ही वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
दही आणि भात वजन कमी करण्यासाठी दही आणि तांदूळ यांचे मिश्रण देखील खूप प्रभावी ठरू शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही भातामध्ये दही मिसळून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला खूप फरक दिसेल.