Dasara Special: Benefits of apta pane, Use of aptyachi paane for health and beauty
दसरा स्पेशल: आपट्याच्या पानांचे हे औषधी उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? सौंदर्यही उजळेल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2023 10:13 AM2023-10-24T10:13:58+5:302023-10-24T10:15:01+5:30Join usJoin usNext दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोनं म्हणून लुटतात... यादिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व असतं. म्हणूनच बघूया आपट्याच्या पानांचे आरोग्याला आणि त्वचेला होणारे फायदे.... त्वचेवरील जखम, व्रण काढून टाकण्यासाठी आपट्याची पाने अतिशय उपयोगी ठरतात. त्यामुळे चेहरा नितळ, स्वच्छ करण्यासाठी आपट्याची पानांचा एकदा वापर करून पाहा.. आपट्याची पाने शुष्क- कोरडी असतात. त्यामुळे सगळ्यात आधी ही पाने पाण्यात भिजत घाला. एखादा तास ती भिजली की वाटून घ्या. त्यात मध आणि थोडं दही टाका. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहऱ्यावरचे डाग हळूहळू कमी होईल आणि चेहरा चमकेल. याशिवाय आपट्याच्या पानांचे अनेक फायदे आहेत. लघवीच्या जागी खूप जळजळ होत असेल तर आपट्याच्या पानांचा काढा घेण्याचा सल्ला दिला जातो. विंचू चावला तर त्या जखमेवर आपट्याची पाने बांधावी. वेदना कमी होतात. पोटाच्या अनेक विकारांवर आपट्याच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पण हे सर्व उपाय करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यायला हवा. टॅग्स :ब्यूटी टिप्सदसराहेल्थ टिप्सहोम रेमेडीBeauty TipsDasaraHealth TipsHome remedy