आलिया भटची लाल साडी ते दीपिका पादुकोणचा अनारकली, अंबानी लग्नसोहळ्यातला सुंदर साड्यांची पाहा झलक... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 06:35 PM 2024-07-13T18:35:48+5:30 2024-07-13T18:44:48+5:30
Deepika Padukone, Priyanka Chopra and More Guests in Vibrant Looks at Anant Ambani and Radhika Merchant’s Star-studded Wedding : अनंत - राधिकाच्या लग्नात फॅशनचे अनोखे ट्रेंड ! काय आहे प्रत्येकाच्या पोषाखाची खासियत... अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यासाठी अवघे बॉलिवूड तसेच जगभरातील विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळी उपस्थित होते. या भव्य लग्नात जवळपास संपूर्ण बॉलिवूड अवतरल्याचं पाहायला मिळालं, जिथे सुंदर अभिनेत्रींचे पोशाख, त्यांची फॅशन पाहून जणू एखादी सौंदर्य स्पर्धाच सुरू असल्याचं दिसून आलं. कारण प्रत्येक अभिनेत्रीचे एकापेक्षा एक सुंदर ड्रेस, साडी परिधान केले होते. या लग्न सोहळ्यात फॅशनचे अनोखे नवनवीन ट्रेंड पाहायला मिळाले.
१. प्रियांका चोप्रा :- देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिचा नवरा गायक निक जोनससोबत या सोहळ्यात आली आहे. या कार्यक्रमात बेफाम होऊन डान्स करतानाचा प्रियांकाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यावेळी प्रियांका गोल्डन रंगाचा घागरा घालून एकदम देसी लूकमध्ये लग्नासाठी उपस्थित होती.
२. पत्रलेखा :- सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याची पत्नी पत्रलेखा हिने संपूर्ण सिंदुरी लाल रंगाचा घागरा परिधान केला होता. यावर तिने हिरव्या रंगांचा कुंदनचा नेकलेस घातला होता.
३. कियारा अडवाणी :- कियाराने या लग्न सोहळ्यात व्ही - नेक गुलाबी ब्लाऊज आणि त्यावर जांभळ्या रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला आहे. तिच्या या लेहेंग्यावर चंदेरी धाग्यांनी केलेले बारीक नक्षीकाम फारच उठून दिसत आहे. या लेहेंग्याला साजेसा असा हेव्ही वर्क असणारा दुपट्टा देखील तिने घेतला आहे.
४. जिनिलिया देशमुख :- अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने राधिका, अनंत यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.यावेळी जिनिलियाने पारंपरिक मराठमोळा लूक केला होता. नऊवारी साडी आणि त्याला साजेसे दागिने जिनिलियाने परिधान केले होते. नववारी साडीला साजेशी चंद्रकोर लावली होती. तर जिनिलियाने नथही घातली होती. तिचा हा लूक राधिका - अनंतच्या लग्नासह सोशल मीडियावरही चर्चेत आहे.
५. दीपिका पदुकोण :- अनंत अंबानींच्या लग्नात दीपिका पदुकोण लाल रंगाच्या ड्रेसमध्ये शाही दिसत होती. तिने सुंदर लाल रंगाचा अनारकली ड्रेस घातला होती. तिच्या ड्रेससोबतच ॲक्सेसरीजही तिला रॉयल लुक देत आहेत. दीपिकाचा हा देसी अवतार पाहून तिचे चाहते घायाळ झाले. तौरानीने डिझाइन केलेली सुंदर लाल अनारकली परिधान करून,तिच्या ड्रेसची किंमत सुमारे १,४५,५०० रुपये आहे. दीपीकाने तिच्या पारंपारिक पोशाखसोबत चोकर नेकलेस घातला होता, दीपिकाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी सिंदूर आणि केसांचा बन केला होता.
६. आलिया भट्ट :- या लग्न सोहळ्यात आलिया भट्टच्या लूकची विशेष चर्चा होती, कारण तिने जी साडी नेसली होती, ती चक्क १६० वर्ष जुनी होती. आलिया भट्ट फुशिया गुलाबी सिल्क साडीमध्ये फारच सुंदर दिसत होती. यावेळी तिने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील फ्युशिया पिंक आशावली सिल्क साडी नेसली होती. या साडीवर जरी वर्क केले होते, या साडीची बॉर्डर ९९ % शुद्ध चांदी आणि ६ ग्रॅम सोन्याने बनलेली होती. आलियाने या साडीला आधुनिक टच देण्यासाठी स्ट्रॅपलेस बस्टीअर ब्लाउज घातले होते. आलियाने तिचा लूक अधिक आकर्षक करण्यासाठी सोन्याचा आणि पाचूचा चोकर नेकलेस घातला होता. कानात झुमके, मांग टिक्का आणि बांगड्याही घातल्या होत्या.
७. कतरीना कैफ :- अंबानींच्या या ग्रँड लग्न सोहळ्यासाठी कतरिनाने बॉर्डरवर सोनेरी नक्षीकाम असणारी लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यावर पूर्ण बाह्यांचा ब्लाऊज आणि सोनेरी रंगाची ज्वेलरी घालून कतरीना खुपच सुंदर दिसत होती. कतरीनाने साडीचा पदर हातावर पूर्णपणे सोडून त्या साडीचा रॉयल लूक दाखवला होता.
८. गौरी खान :- बॉलिवूड बादशहा शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने सोनेरी अनारकली सूट घातला होता. त्यावर तिने त्या सुटला शोभून दिसेल अशी फ्लेर्ड पँट घातली होती. हातातील बॅग, डायमंड नेकलेस, झुमक्या सोबतच हाय हिल्सच्या सँडल घालून तिने परफेक्ट लूक केला होता.