डायबिटीसवर रामबाण उपाय किचनमधली 'ही' एक गोष्ट; रोज खा- शुगर कायम राहील कंट्रोलमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 11:45 AM 2022-09-11T11:45:04+5:30 2022-09-12T12:10:21+5:30
Diabetes Control Food : मधुमेहावरील उपचारांमध्ये अनेकदा औषधे आणि इन्सुलिन इंजेक्शन्सचा समावेश असतो, परंतु अनेक लोकांना अशा पदार्थांमध्येही रस असतो जे रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यात मदत करतात. मधुमेह (Diabetes) हा रक्तातील साखरेच्या असामान्य उच्च पातळीशी संबंधित आहे. (Sugar Level Control Tips) आजच्या काळात ही समस्या बहुतेक लोकांना भेडसावत आहे, ज्यामुळे लोक त्याचे गांभीर्य फार हलक्यात घेऊ लागले आहेत. जर तुम्हाला असेही वाटत असेल की आजकाल प्रत्येकाला मधुमेह आहे, ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे, तर सावधगिरी बाळगा कारण जर त्यावर नियंत्रण न ठेवता किंवा त्यावर उपचार न केल्यास ते तुमचे हृदय, किडनी, मज्जासंस्था बिघडवून अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते. (Homeopath dr smita shared tips to manage diabetes cinnamon helps to control blood glucose level)
मधुमेहावरील उपचारांमध्ये अनेकदा औषधे आणि इन्सुलिन इंजेक्शन्सचा समावेश असतो, परंतु अनेक लोकांना अशा पदार्थांमध्येही रस असतो जे रक्तातील साखरेचे प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यात मदत करतात. तुम्हीही अशा नैसर्गिक इन्सुलिनच्या शोधात असाल तर दालचिनी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (Sugar Level Control Tips)
होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ स्मिता भोईर पाटील यांनी अलीकडेच इंस्टावर मधुमेहामध्ये दालचिनी खाण्याचे फायदे आणि ते कसे वापरावे याबद्दल पोस्ट केले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती लिहिते की दालचिनी हा असाच एक मसाला आहे ज्यामध्ये हेल्दी अँटीऑक्सिडंट असतात. आणि हे रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
जेवण करण्यापूर्वी - निरोगी व्यक्तीचr रक्तातील साखरेची पातळी 100 mg/dl पेक्षा कमी असावी. त्याच वेळी, मधुमेहाच्या रक्तातील साखरेची पातळी 80-130 mg/dl च्या श्रेणीत असावी.
जेवणानंतर 1-2 तास - निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी 140 mg/dl पेक्षा कमी असली पाहिजे, तर मधुमेही व्यक्तीची रक्तातील साखरेची पातळी 180 mg/dl पेक्षा कमी असावी.
गेल्या तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची A1C पातळी - निरोगी व्यक्तीमध्ये 5.7 टक्क्यांपेक्षा कमी आणि मधुमेही व्यक्तीमध्ये 180 mg/dl पेक्षा कमी
एनसीबीआयच्या मते, जर तुम्ही मधुमेहाने ग्रस्त असाल आणि रक्तातील साखरेतील चढ-उतार नियंत्रित करण्यासाठी काही घरगुती किंवा नैसर्गिक उपाय शोधत असाल, तर दालचिनी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, दालचिनीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात.
याव्यतिरिक्त त्यामध्ये असलेले पॉलीफेनॉल ग्लुकोज आणि इन्सुलिन कमी करून मधुमेहाच्या जोखमीपासून संरक्षण करू शकतात. यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते, सांधेदुखी कमी होण्यास मदत होते, ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मधुमेहासाठी दालचिनीचे सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाण्यात मिसळून ते पिणे. यासाठी दालचिनीचा 2 इंच तुकडा किंवा दालचिनीची साल एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी गाळून रिकाम्या पोटी प्या.