साबण वापरुन त्वचा कोरडी पडली? ८ नैसर्गिक उपाय - चेहरा दिसेल सतेज, विसराल साबण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2023 03:03 PM2023-02-21T15:03:19+5:302023-02-21T15:09:36+5:30

Did the soap dry out the skin? 8 Natural Remedies - Face will look fresher साबणा ऐवजी नैसर्गिक उपायाने चेहरा स्वच्छ करा. चेहरा होईल कोमल, मिळेल तेज..

रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्वचेची काळजी घेणं काहींना जमत नाही. धूळ, प्रदूषण, आणि केमिकल प्रोडक्ट्समुळे चेहऱ्याची नमी गायब होते. चेहरा साफ ठेवण्यासाठी आपण साबणाने त्वचा धुतो. मात्र, घरी साबण नसल्यावर त्वचा कशाने धुवावे हा प्रश्न पडतो.

साबणाच्या वापरामुळे चेहरा रखरखीत होतो. त्याजागी आपण मुलतानी मातीचा वापर करू शकता. मुलतानी मातीमध्ये गुलाबजल आणि दूध मिसळून चेहऱ्याला लावा. पेस्ट सुकल्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळेल.

टॉमेटोचा वापर करून त्वचा साफ करता येईल. टॉमेटोच्या पेस्टमध्ये दुध आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ५ मिनटानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. याने चेहरा ग्लो करेल.

एलोवेरा जेल त्वचेसाठी उत्तम ऑप्शन आहे. यासाठी एलोवेरा जेलमध्ये गुलाब जल मिसळून त्वचेवर लावा. चेहऱ्याला सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. ३ मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे डेड स्कीन निघून जाईल.

काकडीचा वापर फक्त सॅलडसाठी नाही तर, चेहरा साफ करण्यासाठी देखील करता येईल. यासाठी काकडीच्या रसात दही मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाईल.

बेसन आणि दही या उपायाने देखील चेहरा साफ करता येईल. बेसन, दही आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. पेस्ट चेहऱ्याला लावा, नंतर पाण्याने धुवा.

त्वचा कोरडी पडली असेल तर, मधात दुध मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. याने चेहरा साफ होईल.

संत्र्याच्या सालीचा वापर करून आपण चेहरा साफ करू शकता. यासाठी संत्र्याच्या सालीची पावडर करा. त्यात मध, लिंबाचा रस, आणि गुलाब जल मिसळून पेस्ट चेहऱ्यावर लावा. याने स्कीन साफ होईल.

दुध एक क्लींजिंग एजंट म्हणून कार्य करते. यासाठी कच्चे दुध घ्या. त्यात कापसाचे गोळे भिजवा. याने चेहरा साफ करा. त्यानंतर काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा. याने त्वचा कोमल होईल.