Diet rules for diabetic patient : नेहमी नियंत्रणात राहिल ब्लड शुगर; डायबिटीक रुग्णांनी 'असा' घ्या आहार, काय खावं, टाळावं? वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 09:53 AM 2021-10-17T09:53:38+5:30 2021-10-17T10:14:30+5:30
Diet rules for diabetic patient : जसजसं डायबिटीसची प्रकरणं वाढत आहेत. तसतसे अनेक खाद्यपदार्थांचे पर्याय बाजारात येत आहेत जे डायबिटीससाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. परंतु हे पदार्थ खाल्ल्यानं आरोग्यासाठी अधिक फायदे होतात याचा पुरावा नाही. जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास होत असेल किंवा भविष्यात हा आजार उद्भवू नये असं वाटत असेल तर त्यामुळे होणारे धोके टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागेल. यासाठी, आपल्या आहाराची योग्य निवड करणे आवश्यक आहे.
कारण योग्य प्रकारचे अन्नाचे सेवन तुम्हाला दीर्घकाळ डायबिटीसारख्या जीवघेण्या आजारापासन लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही डायबिटीक असाल आणि आहारात बदल करण्यास तयार असाल तर तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.
बाजारात डायबिटीक फूड म्हणून विक्रीस असलेल्या पदार्थांपासून लांब राहा जसजसं डायबिटीसची प्रकरणं वाढत आहेत. तसतसे अनेक खाद्यपदार्थांचे पर्याय बाजारात येत आहेत जे डायबिटीससाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. परंतु हे पदार्थ खाल्ल्यानं आरोग्यासाठी अधिक फायदे होतात याचा पुरावा नाही. हे देखील असू शकते की त्यामध्ये इतर पॅकेज केलेल्या अन्नाइतकेच कॅलरी असतात, जे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतात.
स्वत:हून सप्लिमेंट्स घेऊ नका याचा कोणताही पुरावा नाही की खनिज आणि व्हिटॅमिन पूरक सप्लिमेंट्स आपल्याला डायबिटीस व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात. म्हणून, जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देत नाहीत तोपर्यंत तुम्ही स्वतःहून पूरक आहार घेणे सुरू करू नये. आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक पदार्थ अन्नातून मिळवणे सर्वोत्तम आहे.
फळं आणि भाज्या आपल्या सर्वांना माहित आहे की फळे आणि भाज्या आपल्यासाठी चांगल्या आहेत. खरं तर, फळे एक उत्तम स्नॅक पर्याय बनवतात. स्नॅक म्हणून फळांची निवड केल्याने आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतात. जर तुम्ही विचार करत असाल की फळांमध्ये साखर असते, आणि ते तुमच्या आहारातून वगळले पाहिजे, तर असं अजिबात करू नका. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला हानी पोहोचवत नाही. फळांचा रस पिण्याऐवजी रस अख्खी फळं खाल्लेली कधीही उत्तम.
आहारात हेल्दी फॅट्सचा समावेश करा इतर कोणत्याही पोषक तत्वांप्रमाणे, चरबी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. चरबी आपल्याला ऊर्जा देते परंतु विविध प्रकारचे चरबी आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. निरोगी चरबी असलेले पदार्थ निवडा, जसे की अनसाल्टेड नट्स, बियाणे, एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, रेपसीड तेल आणि सूर्यफूल तेल.
मीठ कमी खा जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. आणि जेव्हा तुम्हाला मधुमेहाचा त्रास होतो, तेव्हा तुम्हाला या सर्व परिस्थितींचा धोका जास्त असतो. आहारात मीठ कमी करण्यासाठी, आपल्याला पॅकेज केलेल्या स्नॅक्सच्या वापरापासून दूर राहावे लागेल, कारण त्यात भरपूर मीठ असते. तसेच, तयार अन्नाच्या ताटात मीठ टाकण्याची कधीही सवय लावू नका.
आहारात फायबर्सचा समावेश प्रत्येक जेवणात कमीतकमी 8 ग्रॅम फायबर असणे महत्वाचे आहे, विशेषत: जेव्हा आपण कार्बोहायड्रेट युक्त अन्न घेत असाल. रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यात मदत करण्याबरोबरच, ते तुमच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेईल आणि तुम्हाला अधिक काळ परिपूर्ण वाटेल. आपण आपल्या आहारात मटार, बीन्स, ओट्स, बार्ली, सफरचंद, नाशपाती, बेरी, रताळे, ब्रसेल्स स्प्राउट्स, ब्रोकोली, गाजर आणि बीट्स यासारख्या पदार्थांचा समावेश करावा.
प्रोसेस्ड फूड टाळा जर तुम्ही जास्त रेड मीट आणि प्रक्रिया केलेले अन्न खात असाल तर ते आधी कमी करा. हॅम, बेकन, सॉसेज यांसारखे लाल आणि प्रक्रिया केलेले मांस हृदयाच्या समस्या आणि कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. मांस कडधान्ये आणि अनसाल्टेड नट्ससह बदला कारण हे पर्याय फायबरमध्ये देखील समृद्ध आहेत आणि आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर जास्त परिणाम करत नाहीत.
जेवणात सर्व पोषक घटकांचा समावेश चपाती, भाकरीचा आहारात समावेश असावा. पांढऱ्याऐवजी ब्राऊन राईस वापरा. आपण ओट्स आणि बार्ली सारख्या धान्यांचा देखील समावेश करू शकता. या पर्यायांमुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहील आणि रक्तातील साखरेमध्ये त्वरित वाढ होणार नाही.