‘चमच्यांच्या’ दुनियेतले ‘काटे’ पहा! कोणता चमचा काय खाण्यासाठी वापरतात, बघा प्रकार आणि उपयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 04:24 PM2022-08-27T16:24:38+5:302022-08-27T16:30:09+5:30

चमच्यांचे जसे वेगवेगळे प्रकार असतात तसेच काटे चमच्यांचे म्हणजेच फोर्क प्रकारात येणाऱ्या चमच्यांचेही असतात. त्याचेच वेगवेगळे प्रकार कोणते आणि कोणत्या फोकचा कसा उपयोग करायचा ते बघा..

१. ऑयस्टर फोर्क- ऑयस्टर त्याच्या शेलपासून वेगळे करण्यासाठी या चमच्याचा उपयोग केला जातो.

२. फ्रुट फोर्क- फळांचे तुकडे खाण्यासाठी फ्रुट फोक वापरले जातात.

३. चीज फोर्क- चीजचे तुकडे उचलून ते सर्व्ह करण्यासाठी चीज फोकचा उपयोग होतो.

४. पेस्ट्री फोर्क- नावानुसार लगेच लक्षात येतं की पेस्ट्रीचे तुकडे कापून ते खाण्यासाठी हा फोक वापरला जातो.

५. स्पॅगिटी फोर्क- लांब स्पॅगिटी नुूडल्स सर्व्ह करण्यासाठी आणि खाण्यासाठी या फोकचा उपयोग होतो. याच्या आजूबाजूचे दोन काटे झिगझॅक आकाराचे असतात.

६. टेबल फोर्क- पास्ता, भाताचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे जो काटा चमचा वापरतो तो टेबल फोक नावाने ओळखला जातो.

७. कॉकटेल फोर्क- प्रामुख्याने मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी हा फोक वापरला जातो. हा फोक दिसायला फ्रुट फोक सारखाच असतो. पण त्याचे काटे जरा जास्त निमुळते असतात.