इरकल साडीचा थाट न्यारा! पाहा ५ सुंदर साडी डिझाइन्स, एकतरी हवीच मायेची इरकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 15:48 IST2025-04-04T15:39:58+5:302025-04-04T15:48:15+5:30

इरकल साडी म्हणजे मुळची कर्नाटकची. वीण पाहूनच तिचा प्रकार लगेच लक्षात येतो. दिसायला थोडीफार खण साडी सारखीच वाटत असली तरी तिचा बाज वेगळाच असतो...

काही ठिकाणी इक्कत साडी म्हणूनही ही साडी ओळखली जाते.

अशी एखादी तरी इरकल साडी आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी. कारण ही साडी नेसायला, कॅरी करायला खूप सोपी असते आणि शिवाय ती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना आपण नेसू शकतो.

कॉटन प्रकारातली अशी इरकल साडी मिळते. काही साड्या प्लेन असतात तर काहींवर अशी बारिक लाईनिंग असते.

अशा पद्धतीची इरकल साडी तर ऑफिसमध्येही नेसून जाऊ शकता. तिच्यावर जर थोडं फॉर्मल ब्लाऊज शिवलं तर ती कम्प्लिट ऑफिस लूक देऊ शकते.

इरकल साडीमध्ये अशा पद्धतीची सिल्क साडीही मिळते. ही साडी चांगलीच महाग असून कमीतकमी ६ हजार रुपयांपासून ती सुरू होते.

अशा पद्धतीची बुट्टी असणारी जी सिल्क इरकल असते तिला इरकल पैठणी म्हणूनही ओळखलं जातं.

इरकल साडीच्या काही प्रकारांमध्ये असं फक्त काठांना वर्क केलं जातं आणि बाकी ठिकाणी ही साडी प्लेन असते.