खोटे दागिने घातले की कान चिघळतात-दुखतात? ६ टिप्स-मोठे कानातले घालूनही त्रास गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 04:02 PM2024-10-18T16:02:51+5:302024-10-18T16:10:15+5:30

disadvantages of artificial earrings & home remedies for earache or ear pain : How do you treat an infected ear from fake earrings : Here’s How to Get Rid of Skin Allergy Due to Artificial Jewellery : आर्टिफिशियल कानातले घालून कानाला जखमा होतात, रक्त येतं असं होऊ नये यासाठीच हे खास उपाय...

आजकाल खऱ्या दागिन्यांपेक्षा खोटे व आर्टिफिशियल दागिनेच जास्त वापरले जातात. सध्या आर्टिफिशियल दागिने वापरण्याचा एक हटके ट्रेंडच स्त्रियांमध्ये दिसून येतो. खोटे आर्टिफिशियल दागिने वापरणे हे तसे सगळ्याच दृष्टीने स्त्रियांना अतिशय सोयीस्कर पडते. आर्टिफिशियल दागिने वजनाने हलके असल्यामुळे व्यवस्थित कॅरी करता येतात. असे आर्टिफिशियल एअररिंग्स सतत वापरल्याने काही जणींना तर त्या ठिकाणी लगेचच रॅशेज येतात तर त्वचा लाल पडते. यासोबतच काहीवेळा तिथली त्वचा चिघळून त्यातून एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडतो. आर्टिफिशियल एअररिंग्स घातल्याने कानाच्या त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून काही सोपे उपाय पाहूयात(Here’s How to Get Rid of Skin Allergy Due to Artificial Jewellery).

लसूण पाकळ्यांचा वापर करुन आपण कानाच्या त्वचेचे संरक्षण करु शकतो. यासाठी एक लसूण पाकळी सोलून घ्यावी. आता आर्टिफिशियल कानातले घालण्यापूर्वी त्या कानातल्याच्या मागील जो भाग आपल्या कानाच्या छिद्रांत जातो तो लसूण पाकळ्यांमध्ये ५ ते ६ वेळा आत बाहेर करून टोचून घ्यावा. असे केल्याने आर्टिफिशियल कानातले घालूंन देखील आपल्या त्वचेला कोणत्याही प्रकारची इजा किंवा स्किन खराब होणार नाही. लसूण पाकळीमध्ये अँटीफंगल, अँटिसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे कानाच्या त्वेचेचे संरक्षण केले जाते.

आर्टिफिशियल कानातले घालण्यापूर्वी कानातल्यांच्या मागे असणाऱ्या त्या छोट्याशा दांडीला थोडेसे नेलपेंट लावावे. त्यानंतर १० ते १५ मिनिटे तसेच ठेवून नेलपेंट पूर्णपणे सुकू द्यावेत. यामुळे आर्टिफिशियल कानातले घालून देखील कानाची स्किन चिघळून खराब होत नाही.

जर खोटे आर्टिफिशियल एअररिंग्स घातल्यामुळे आपले कान खराब झाले असतील तर काही घरगुती उपायांनी ते बरे होऊ शकतात. यासाठी मोहरीचे तेल हलके गरम करून कानांना लावू शकता, यामुळे आपल्याला आराम मिळेल.

चमचाभर हळद घेऊन ती खोबरेल तेलात गरम करून कानाला लावल्याने आर्टिफिशियल कानातले घातल्यामुळे कानाला आलेली सूज लवकर बरी होते.

वजनाने जड, मोठे कानातले घालण्यापूर्वी आणि काढल्यानंतर कानांच्या पाळ्यांना मॉइश्चरायझिंग क्रिम लावायला विसरु नका. मॉइश्चरायझिंग क्रिम लावल्याने कानावर जास्त दाब जाणवणार नाही, याशिवाय वेदनाही कमी होतील.

चिघळलेल्या कानांच्या त्वचेवर खोबरेल तेल लावून हलकेच मालिश करणे हा उत्तम पर्याय आहे. जर कानाच्या छिद्रात जास्त कोरडेपणा असेल आणि त्वचा ताणली जाऊ लागली असेल तर खोबरेल तेल देखील लावू शकता.

टॅग्स :फॅशनfashion