Diwali 2024 : दिवाळीत भरभर काढता येतील अशा सोप्या-आकर्षक १० रांगोळ्या; घराची शोभा वाढेल By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 06:14 PM 2024-10-20T18:14:19+5:30 2024-10-21T16:07:49+5:30
Diwali 2024 : रांगोळी काढण्यासाठी तुम्ही बांगड्या, खडू, मासिचची काडी, हेअर पीन, वाटी, कंगवा सुपारी अशा वेगवगेळ्या वस्तूंची मदत घेऊ शकता. दिवाळी (Diwali 2024) हा भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. दिवाळीच्या दिवसांत सर्वत्र रोषणाई असते आणि घरांघरात रांगोळ्या काढल्या जातात. दारांसमोर काढल्या जाणाऱ्या आकर्षक रांगोळ्या पाहून मन प्रसन्न होते. प्रत्येकाच आपल्या दारासमोर सुंदर रांगोळी काढावी असं वाटतं पण काहीजण वेळेअभवी रांगोळ्या काढू शकत नाहीत. (Diwali Special Easy Rangoli Design)
तर काहींना रांगोळी काढायला जमत नाही. तुम्हालाही रांगोळ्या काढण्याचं काम अवघड वाटत असेल तर तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरून सुंदर रांगोळी काढू शकता. (Easy Rangoli For These Diwali)
रांगोळी काढण्यासाठी तुम्ही बांगड्या, खडू, मासिचची काडी, हेअर पीन, वाटी, कंगवा सुपारी अशा वेगवगेळ्या वस्तूंची मदत घेऊ शकता.
रांगोळी काढण्यासाठी सर्वात सोपी ट्रिक म्हणजे ठिपके जोडून रांगोळी काढणं. ठिपक्यांच्या रांगोळीचे पारंपारीक महत्व आहे ठिपक्यांची रांगोळी साधी, सोपी असून त्यात आपण हवे ते रंग भरू शकतो.
दिवाळीत रांगोळी काढण्याासाठी तुम्ही स्टेनसिल्सचा वापरही करू शकता.
कलरफुल रांगोळी काढून तुम्ही त्यात शुभ दिपावली असा संदेश लिहू शकता किंवा धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज अशा वेगवेगळ्या दिवसाच्या रांगोळ्या काढून त्यावर लिहा.
रांगोळीत मोराची डिजाईन खूप उठून दिसते पण मोर प्रत्येकालाच काढायला जमतो असं नाही तुम्ही आधी खडून मोराची आकृती काढून नंतर त्यात रंग भरू शकता.
लक्ष्मीची पाऊल, गणपती, स्वास्तिक या डिजाईन्सचे ठसे तुम्हाला कोणत्याही रांगोळीच्या दुकानात मिळतील याचा वापर तुम्ही रांगोळीत करू शकता.
दिव्याची डिजाईन काढून त्यात आकर्षक रंग भरा आजूबाजूला पणत्या ठेवल्यास डिजाईन उठून दिसेल.
सजावटीसाठी तुम्ही रांगोळीवर पाण्यावर तरंगणारे दिवे किंवा फुलं ठेवू शकता,
(Image Credit- Social Media)