Diwali 2024 : मराठी थाट आणि ठूशीचा साज! पारंपरिक ठूशीच्या १० नव्या डिझाइन्स-दिवाळीत साडीवर ठूशी तर हवीच By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:26 PM 2024-10-28T13:26:34+5:30 2024-10-28T13:49:02+5:30
Diwali 2024 : २०० रूपयांपासून ते १००० रूपयांपर्यंत तुम्हाला विविध रेंज आणि आकर्षक पॅटर्नमध्ये ठूशी उपलब्ध होतील. दिवाळीत (Diwali) साडीवर पारंपरीक, मराठमोळी ठूशी घालावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. दिवाळीत घालता येतील अशा ठूशीच्या सिंपल, आकर्षक डिजाईन्स पाहूया. (Diwali Special Thushi Designs)
काठापदराच्या साडीवर किंवा जरीच्या ड्रेसवरही तुम्ही ठूशी घालू शकता. ठुशीचे हे नवीन कलेक्शन तुम्हालाही फार आवडेल.
तुम्ही घरातल्या स्त्रियांनी काही भेट देऊ इच्छित असाल तर या डिसेंट ठूशी गिफ्ट करू शकता.
नाजूक, हेवी, असे प्रत्येक पॅटर्न तुम्हाला ठूशीमध्ये उपलब्ध होतील.
२०० रूपयांपासून ते १००० रूपयांपर्यंत तुम्हाला विविध रेंज आणि आकर्षक पॅटर्नमध्ये ठूशी उपलब्ध होतील.
तुम्ही ठूशीचा अख्खा सेटही विकत घेऊ शकता. त्यावर तुम्हाला कानातले आणि मोठा हारही मिळेल २ ते ३ हजारात हा अख्खा सेट असेल जो तुम्ही कधीही घालू शकता.
जर तुम्हाला सिंगल हेवी दागिना घालायचा असेल तर या पद्धतीची ठूशी उत्तम आहे.
लॉग्न मंगळसुत्राच्या वर अशी ठूशी तुम्ही घातली तर अधिकच शोभून दिसेल.
ठूशीवर साजेसे कानातले किंवा झुमकेसुद्धा घालू शकता.
गोल्डन आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन हे इव्हरग्रीन आहे. ठूशीमध्ये मोत्यांचा वापर असेल तर अधिकच उठून दिसते.
एक लेअरपासून ते तीन लेअर्स असलेली ठुशी तुम्हाला ऑनलाईन किंवा बाजारात सहज उपलब्ध होईल.
(Image Credit- Social Media)