Diwali Dhanteras Rangoli : धनत्रयोदशीला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळ्या; पाहा सायंकाळी काढता येतील अशा खास रांगोळ्य By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 08:26 PM 2024-10-28T20:26:07+5:30 2024-10-29T15:11:23+5:30
Diwali Dhanteras Rangoli : धनत्रयोदशीची रांगोळी काढल्यानंतर उंबरठाही खुलून दिसेल. धनत्रयोदशी हा दिपावलीचा दुसरा दिवस (Dhanteras Special Rangoli Designs). या दिवसापासून खऱ्या दिवाळीची सुरूवात होते. धनत्रयोदशीला दारापुढे तुम्ही रांगोळी काढण्याच्या विचारात असाल तर या सोप्या रांगोळी डिजाईन्स तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.
धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या सोप्या, सुंदर रांगोळ्या काढू शकता आणि दिव्यांनी सुंदर सजावट करू शकता.
या रांगाळीत तुम्ही सोन्याच्या कॉईन्सनी भरलेला घडा, लक्ष्मीची पाऊलं काढू शकता.
या रांगोळीत तुम्ही तुम्हाला आवडणारे सुंदर रंग भरू शकता.
धनत्रयोदशीची रांगोळी काढल्यानंतर उंबरठाही खुलून दिसेल.
कॉईन्स, बांगड्यांचा वापर करून तुम्ही सुंदर अशी रांगोळी काढू शकता.
या रांगोळीत कळससुद्धा चांगला दिसेल. त्यावर स्वास्तिक काढू शकता.
रांगोळीच्या मधोमध तुम्ही लक्ष्मीची पाऊलं काढू शकता.
लक्ष्माची पाऊलं आणि स्वास्तिक असं कॉम्बिनेशन चांगलं दिसेल.
मोर आणि मोराची पिसं काढून तुम्ही त्यावर शुभ धनत्रयोदशी असा संदेश लिहू शकता.
देव्हाऱ्याच्या पुढे किंवा दरवाज्यात काढण्यासाठी या रांगोळी डिजाईन्स उत्तम आहेत.