Diwali Jewellery Shopping : दिवाळीत खरेदी करा १ ग्रॅम सोन्याची नाजूक अंगठी; १० आकर्षक डिजाइन्स By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:12 PM 2024-10-21T15:12:36+5:30 2024-10-21T20:27:31+5:30
Diwali Jewellery Shopping : रोज ऑफिसला जाताना घालण्यासाठी किंवा पार्टीला जाताना घालण्यासाठी या उत्तम डिजाईन्स आहेत. दिवाळीला बरेचजण सोनं खरेदी करतात. सण उत्सवांच्या काळात सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. बऱ्याच महिलांना अंगठ्या घालण्याची फार आवडत असते. अंगठी घालणं आवडत नसेल तरी साखरपुड्याची अंगठी प्रत्येक महिलेच्या बोटात असतेच. (Diwali Jwellery Gold Rings Gold finger Rings Design)
१ ते २ ग्रॅम सोन्यात तुम्ही आकर्षक सोन्याच्या अंगठ्या खरेदी करू शकता. सोन्याच्या अंगठ्याचे काही लेटेस्ट, आकर्षक पॅटर्न्स पाहूया. (Diwali Jewellery Shopping)
रोज वापरण्यासाठी किंवा कोणाला गिफ्ट देण्याासाठी या अंगठ्या उत्तम पर्याय आहेत. तुम्ही हवी ती डिजाईन निवडू शकता.
अंगठी घातल्यानं हात चांगला दिसतो तसंच बोटांचीही शोभा वाढते. १५ ते २० हजारांच्या आत तुम्हाला हवीतशी नाजूक डिजाईन बनवून मिळेल.
रोज ऑफिसला जाताना घालण्यासाठी किंवा पार्टीला जाताना घालण्यासाठी ही उत्तम डिजाईन आहे.
ऑनलाईनसुद्धा अंगठ्यांच्या बऱ्याच डिजाईन्स उपलब्ध आहेत किंवा ज्वेलर्सच्या दुकानातून तुम्ही सुंदर सुंदर रिंग्स खरेदी करू शकता.
सिंपल साळखीची नाजूक डिजाईन तुमच्या हातांना एलिगंट लूक देईल.
सोनं आणि अमेरिकन डायमंड एकत्र असलेलं कॉम्बिनेशन अंगठीत उठून दिसतं. तुम्ही त्या प्रकारचे डिजाईन बनवून घेऊ शकता.
अंगठीत तुम्ही तुम्हाला आवडते प्राणी सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव लिहू शकता.
(Image Credit- Social Media)