Diwali Laxmi Pujan Rangoli : लक्ष्मी पूजनाला पटापट काढता येतील अशा १० आकर्षक रांगोळ्या; घरात येईल प्रसन्नता By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 04:29 PM 2024-10-30T16:29:15+5:30 2024-10-30T18:42:44+5:30
Diwali Laxmi Pujan Rangoli : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दारासमोर काढता येतील अशा काही खास रांगोळी डिजाईन्स पाहूया. लक्ष्मी पूजनाच्या (Laxmi Pujan) दिवशी घरोघरी लक्ष्मी मातेची अन् धनाची, पैश्यांची पूजा केली जाते. या दिवशी प्रत्येकाच्याच घराचे दरवाजे हे रांगोळ्यांनी आणि दिव्सांनी सजलेले असतात. (Diwali Laxmi Pujan Rangoli)
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दारासमोर काढता येतील अशा काही खास रांगोळी डिजाईन्स पाहूया. (Diwali Special Laxmi Pujan Rangoli Designs)
तुम्ही जिथे पूजा करणार असाल त्या ठिकाणी किंवा दरवाज्यात या आकर्षक, सोप्या रांगोळ्या काढू शकता.
लक्ष्मीची पाऊलं, कळस, कमळ, यांची रांगोळी तुम्ही घरच्याघरी कमी वेळात काढू शकता.
या रांगोळीत तुम्ही हळद, कुंकू, मंगळसुत्र, बांगड्या अशा विविध आकृत्या काढू शकता.
लक्ष्मीपूजनाची रांगोळी पाहून मन प्रसन्न होईल आणि घराचीही शोभा वाढेल.
कमळ आणि मोराच्या रांगोळ्यांनी दार सजवले तर अजूनच घर उठून दिसेल.
लक्ष्मी पूजन किंवा हॅप्पी दिवाळी असा मेसेजसुद्धा तुम्ही रांगोळीत लिहू शकता.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला रांगोळी काढण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही रेडिमेड लक्ष्मीची पाऊल साच्यानं काढू शकता.
(Image Credit- Social Media)