Diwali padwa 2021 : इश्कवाला लव्ह लग्नानंतरही कायम ठेवणारी रोमँटिक कपल्स! केमिस्ट्रीची 'गुलाबी' गोष्ट; पाहा फोटो..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 10:14 AM2021-11-05T10:14:12+5:302021-11-05T10:15:02+5:30

Diwali padwa 2021: दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण केलं जातं व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो.

दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा आणि वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. (Diwali 2021)

या दिवशी सर्वच जोडप्यांमध्ये कमालीचा उत्साह असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच प्रसिद्ध जोडप्यांचे फोटो दाखवणार आहोत. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण केलं जातं व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो.

तर नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.

सेलिब्रिटीसुद्धा सणासुदीला आपल्या चाहत्यांसह खास क्षणांचे फोटो शेअर करत असतात.

आधी मैत्री मग प्रेम नंतर लग्नगाठ बांधलेली जोडपी तुम्ही पाहू शकता. आजही अनेक जोपड्यांनी त्यांच्या नात्यातलं वेगळेपण टिकवून ठेवलंय

या जोडप्याचे आगळे वेगळे आऊटफिट्स नेहमीच ट्रेंड सेट करतात तर कधी चर्चेचा विषय ठरतात. अभिनेत्रींप्रमाणे सुंदर परफेक्ट दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.

यात बॉलिवूडच्या जोडप्यांचाही आवर्जून उल्लेख केला जातो. अक्षय कुमार आणि ट्विंकल हे सेलिब्रिटी नेहमीच आपले फोटो शेअर चाहत्यांना शुभेच्छा देतात.

ऐश्वर्या आणि अभिशेक बच्चन सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसले तरी सोशल मीडियावर चर्चेत असतात.

सैफ आणि करिना आपल्या दोन्ही मुलांसह यंदाची दिवाळी साजरी करत आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून प्रसिद्ध जोडप्यांमध्ये जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.