Diwali : झगमग झगमग लायटिंगच्या पाहा अनोख्या माळा, स्वस्तात मस्त ८ लेटेस्ट पर्याय! घरभर करा सुंदर रोषणाई By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 03:26 PM 2024-10-22T15:26:57+5:30 2024-10-22T15:48:43+5:30
Diwali Shopping lighting decoration ideas : आपल्याला आणि येणाऱ्या पाहुण्यांनाही वाटेल एकदम फ्रेश.. पारंपरिक लायटींगच्या माळा घरोघरी असतातच, पण काळ बदलला त्यानुसार घराची ठेवणही बदलली. म्हणूनच नव्या घराला साजेल-शोभेल अशा माळा खरेदी करायच्या असतील तर हे पाहा एकाहून एक छान पर्याय (Diwali Shopping lighting decoration ideas).
नेहमीच्या गोल आकाराच्या दिव्यांपेक्षा अशाप्रकारचे थोडे फॅन्सी फुलांचे दिवे असतील तर या माळा गॅलरी, घराचा दरवाजा, खिडकी अशा कुठेही लावल्या तरी छान दिसतात.
पारंपरिक माळांप्रमाणेच दिसणारे पण थोडे चांगल्या दर्जाचे असे हे दिवे बल्ब लावल्यासारखे दिसतात. याच्या माळांचे रंगही नेहमीपेक्षा थोडे वेगळे असतात. मोठी गॅलरी असेल तर असे लाईटस फारच चांगले दिसतात.
गेल्या काही वर्षात अशाप्रकारचे पणत्या, चांदण्या अशा आकाराच्या एलइडी लाईटच्या माळा मिळतात. या माळा दिसायला तर छान दिसतातच पण त्या वजनानेही हलक्या असतात.
आपल्याकडे घरातच असलेल्या पारंपरिक माळांना थोडा वेगळा लूक देऊ शकतो. यासाठी या माळांच्या मध्ये अशाप्रकारे पणत्यांच्या किंवा आपल्याला आवडतील तशा कादगाच्या माळा करुन सोडायच्या. यामुळे एक वेगळा आणि छान लूक येऊ शकतो.
घराच्या आत भिंतीवर किंवा खिडकीच्या आसपास या माळा लावायच्या असतील आणि लायटींगबरोबरच आणखी काही करुन घराची शोभ वाढवायची असेल तर अशाप्रकारे खोट्या पानांच्या, फुलांच्या माळा लायटींगसोबत सोडल्या तरी छान दिसतं.
लाईटच्या माळांना थोडा वेगळा पर्याय म्हणून पाहत असाल तर बाजारात सध्या अशाप्रकारचे बरेच दिवे आले आहेत. अतिशय नाजूक पण सुंदर दिसणाऱ्या या दिव्यांचे रिफ्लेक्शनही खूपच छान पडते.
फॅन्सी पण अतिशय सोबर दिसणाऱ्या या बरण्यांमधील लायटींग फारच सुरेख दिसते. अगदी टेबलवर किंवा घराच्या एन्ट्रन्सला आपण अशाप्रकारच्या लाईटच्या बरण्या मांडून ठेवू शकतो. या बरण्यांमध्ये बरेच रंग आणि आकार उपलब्ध असतात.