Bun Hairstyle For Diwali : दिवाळीत ५ मिनिटांत करता येतील अशा १० सोप्या हेअरस्टाईल्स; साडी लूक होईल परफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:02 PM2024-10-29T15:02:54+5:302024-10-29T15:54:20+5:30

Diwali Special Indian Bun Hairstyle : असे बन बांधल्यानंतर तुमच्या ब्लाऊजचं पॅटर्नसुद्धा व्यवस्थित दिसेल.

दिवाळीच्या दिवसांत प्रत्येक महिलेला साडी नेसण्याचा मोह होतो. साडी नेसल्यानंतर मराठमोळा-पारंपारीक लूक मिळतो. साडीवर नेहमीच मोकळे केस ठेवण्यापेक्षा किंवा रबर लावण्याऐवजी तुम्ही केसांचा सुंदर असा बन बांधू शकता.(Diwali Special Indian Bun Hairstyle)

दिवाळीत नवीन साड्यांवर ट्राय करता येतील अशा काही सोप्या बन हेअरस्टाईल्स पाहूया. ज्यामुळे तुम्हाला टिपिकल लूक मिळणार नाही.

काठापदराच्या साडीवर तुम्ही या बन हेअरस्टाईल्स करू शकता. लो बन कोणत्याही साडीवर छान दिसेल.

बन बांधल्यानंतर तुम्ही मोगऱ्याचा फुलांचा गजरा किंवा गुलाबाच्या फुलानं लूक खूलवू शकता.

आजकाल बाजारात वेगवेगळे हेअर ब्रोच मिळत आहेत. हे हेअर ब्रोच लावून तुम्ही एलिगंट दिसाल.

बन बांधल्यानंतर तुमच्या ब्लाऊजचं पॅटर्नसुद्धा व्यवस्थित दिसेल.

फ्रंट ब्राईडेट मेसी हेअर बन, फिशटेल ब्राईडेड बन, लूज साईड बन या प्रकार तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता.

जर तुम्हाला आर्टिफिशियल फुलं आवडत असतील तर तुम्ही लहान साईजचे फुलांच्या डिजाईनचे क्लिप्स केसांमध्ये लावू शकता.

बारीक जिप्सीची फुलं तुम्हाला फुल मार्केटमध्ये मिळतील. या फुलांचा बन नेहमीपेक्षा वेगळा दिसेल.

केसांची वेणी घालताना तुम्ही यावर बारीक फुलांनी सजावट करू शकता.