मुलं बोबडं बोलतात? 'हा' सोपा उपाय करा, स्पष्ट बोलायला लागतील- इंग्रजी उच्चारही सुधारतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2024 11:32 AM2024-01-05T11:32:19+5:302024-01-05T18:13:31+5:30

सुरुवातीला मुलांचे बोबडे बोल ऐकावेसे वाटतात. कानाला ते अगदी गोड वाटतात. पण मुल ४- ५ वर्षांचं झालं की त्याने स्पष्ट बोलावं असं वाटतं.

इंग्रजीचे उच्चारही मुलांचे अगदी स्पष्ट किंवा फ्लूएंट असावेत असं वाटतं. पण तरीही ४- ५ वर्षांचं झाल्यावरही मुलांचे उच्चार स्पष्ट होत नसतील तर त्यांना हे काही टंग ट्विस्टर म्हणायला सांगता. यामुळे मुलांचं बोबडं बोलणं नक्कीच कमी होईल. हे उपाय theparenthoodjournal या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

यापैकी पहिलं आहे I scream, you scream,we all scream for ice cream...

zebra's zig and zebra's zag हे आहे दुसरं टंग ट्विस्टर. ही वाक्य मुलांना सुरुवातीला हळूवारपणे एकामागे एक म्हणायला लावावी.

तिसरं टंग ट्विस्टर आहे toy boat try boat. साधारण एका मागे एक याप्रमाणे ४ ते ५ वेळा म्हणायला लावावं.

bad money mad bunny हे आहे चौथे टंगट्विस्टर.. हसत- खेळत मुलांचे उच्चार सुधारण्याची ही एक अगदी गंमतशीर पद्धत आहे.

पाचवे टंगट्विस्टर आहे red lorry yellow lorry. काही दिवस हा प्रयोग करून पाहा. मुलांचं बोबडं बोलणं नक्कीच कमी होईल.