कांदा खाता पण कांद्याचे महत्त्वच माहिती नाही? उन्हाळ्यात तर कांदा म्हणजे वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 19:30 IST2025-04-09T19:24:24+5:302025-04-09T19:30:59+5:30

Do you eat onions but don't know the importance of onions? : शरीरासाठी कांदा फार फायदेशीर असतो. आहारात तर असलाच पाहिजे.

कांदा आपल्या आहारातला एक महत्त्वाचा भाग आहे. वाटण असो की फोडणी असो. त्यात कांदा हवाच. भाजी आणि आमटीतही कांदा घातला जातो. पण अनेकदा माहितीच नसते की कांदा किती गुणकारी आहे.

कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात. जीवनसत्त्व 'ए' जीवनसत्त्व 'बी' कांद्यामध्ये असते. तसेच कांद्यामध्ये फायबर असतात. अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. इतरही अनेक पोषकतत्वे असतात.

शरीरासाठी कांदा फायदेशीर ठरतो. हृदयाच्या आरोग्यासाठीही कांदा चांगला असतो. कांद्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच कांदा अनेकदृष्या फायदेशीर असतो.

कांदा पचनासाठी फार चांगला असतो. फायबरचे प्रमाण कांद्यामध्ये भरपूर असते. त्यामुळे पचन प्रक्रियेसाठी कांदा फायद्याचा ठरतो.

कांद्यामध्ये क्रोमियम असते. क्रोमियममुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असणार्‍यांसाठी कांदा चांगला.

त्वचेसाठी कांदा गुणकारी असतो. कांद्यातील अँण्टी ऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात.

ओनियन शाम्पू हा प्रकार सध्या फार लोकप्रिय आहे. केसांचे गळणे कांद्याच्या वापरामुळे थांबते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी कांदा वापरा.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हामुळे फिट येणारे लोक खिशात कांदा घेऊन फिरतात. कारण कांद्यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. कांद्याच्या वासानेही शुद्ध येते.