प्रोटीनसाठी डाळी खा, पण कोणत्या डाळीतून मिळते किती प्रोटीन, माहीत आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 07:32 PM2022-02-25T19:32:02+5:302022-02-25T19:36:07+5:30

१. शाकाहारी आहारातून प्रोटीन मिळवायचं असेल, तर वेगवेगळ्या डाळी हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. पण कोणत्या डाळींमधून किती प्रोटीन मिळतं., प्रोटीन मिळविण्याचे अन्य पर्याय कोणते, हे जाणून घेणं आणि त्यानुसार आपला प्रोटीन इनटेक प्लॅन ठरवणं गरजेचं आहे...

२. शरीराची जडणघडण व्यवस्थित होण्यासाठी, स्नायुंना बळकटी देण्यासाठी आणि नविन स्नायुंच्या निर्मितीसाठी प्रोटीन इनटेक योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे.

३. खिचडीमध्ये किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरली जाणारी डाळ म्हणजे मुगडाळ. एक मध्यम आकाराच्या वाटीभर मुगडाळीतून ९ ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं.

४. चना डाळ म्हणजेच हरबरा डाळ जर आपण एक मध्यम आकाराची वाटी भरून घेतली तर त्यातून आपल्याला ७ ग्रॅमपर्यंत प्रोटीन मिळू शकतं.

५. अनेक घरांमध्ये रोजच्या वरणासाठी तूर डाळच वापरली जाते. एक वाटी भर तूर डाळ आपल्याला ११. ९ ग्रॅ म प्रोटीन देते.

६. इतर डाळींच्या तुलनेत मसूर डाळीचा उपयोग तसा अनेक घरांमध्ये कमीच होतो. पण प्रोटीनच्या बाबतीत ही डाळही अतिश पौष्टिक असून एक वाटी मसूर डाळ जवळपास ९ ग्रॅम एवढे प्रोटीन देऊ शकते.

७. उडीद डाळ ही फक्त इडली- डोसा किंवा वडे यासाठीच वापरली जाते. पण ही डाळही अतिशय पौष्टिक असून तिचा वापर वाढवला पाहिजे. वाटीभर उडीद डाळ ८ ग्रॅमच्या आसपास प्रोटीन देते.