रोज भात खाल्ल्याने डायबिटीस वाढतं का? तज्ज्ञ सांगतात या पद्धतीने भात खा, वजन-शुगर वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 08:42 PM2024-06-30T20:42:36+5:302024-06-30T21:08:54+5:30

Does Eating Rice Everyday Make You Diabetic : रिफाईंड अन्नाचे अधिक सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते. लठ्ठपणा आणि डायबिटीजचा धोका वाढतो.

डायबिटीस (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे. खाण्यापिण्यात पोषक तत्वांचा अभाव यांमुळे डायबबिटीस होतो. या आजारावर कोणताही उपाय नाही. खाणं-पिणं आणि लाईफस्टाईल सुधारून तुम्ही डायबिटीस नियंत्रणात ठेवू शकतात. जास्त भात खाल्ल्याने डायबिटीस होतो असं अनेकांचे म्हणणे असते. हेल्थ एक्सपर्ट खूशबू यांनी रोज भात खाल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढतो का याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Eating While Rice Regularly May Raise Type 2 Diabetes Risk)

डायबिटीस अशी स्थिती आहे ज्यामुळे ब्लड शुगर वाढते इंसुलिनचे प्रमाण कमी होते. (Does Eating Rice Everyday Make You Diabetic) एक्सपर्ट्सच्यामते तांदूळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. अशा स्थितीत डायबिटीसच्या रुग्णांनी याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर डायबिटीसचा धोका वाढतो.

म्हणून रोज तांदूळ खाणं टाळावं. एक्सपर्ट्सच्यामते तांदूळाला रिफाईंड अन्नाच्या स्वरूपात समजले जाते. रिफाईंड अन्नाचे अधिक सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते. लठ्ठपणा आणि डायबिटीजचा धोका वाढतो.

एक्सपर्ट्सचा सांगतात की भात खाल्ल्यास याचे प्रमाण संतुलित राहते. अधिक प्रमाण भात खाल्ल्याने डायबिटीस वाढण्याची शक्यता असते.

तुम्हाला भात खायला आवडत असेल तर तुम्ही ब्राऊन राईस, ब्लॅक राईस किंवा रेड राईस खाऊ शकता. ज्याचा तब्येतीचा चांगला फायदा होतो.

डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवा. रोज व्यायाम करा जर तुम्हाला व्यायाम जमत नसेल तर रोज चालायला जा. यामुळे शुगर नियंत्रणात येण्यास मदत होईल.

गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी या पदार्थांचा आहारात समावेश करा. ज्यामुळे आहारात भरपूर पोषण मिळेल.