नवरात्रीत कुमारीका पुजनाला काय भेटवस्तू द्यायची? पाहा ७ पर्याय, स्वस्त आणि सुंदरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2023 09:45 AM2023-10-09T09:45:07+5:302023-10-11T16:45:52+5:30

Navratri Kumarika Pujan Gift Ideas Shopping

नवरात्री म्हटली की कुमारीका पूजनाला विशेष महत्त्व असते. कुमारीकांना ओवाळून त्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची पद्धत आहे.

बहुतांश घरी ५ किंवा ७ कुमारीकांना पूजेसाठी बोलावले जाते. त्यांची पूजा करुन त्यांना फराळ दिला जातो. स्त्रियांना मान देणे हा त्यामागील मुख्य उद्देश असतो.

मुलींना शाळेसाठी पेन्सिल, खोडरबर, खडू, पेन, शार्पनर असे काही ना काही सतत लागतेच. अशा गोष्टींचा सेट दिल्यास मुलींसाठी उपयुक्त वस्तू होऊ शकते.

पर्स ही लहान मुलींना आवडणारी आणखी १ गोष्ट. मोठ्या महिलांसारखी आपणही पर्स घ्यायला त्यांना आवडत असल्याने लहानशी पर्स दिल्यास मुली खूश होतात.

ताग्यातले कापड हा मुलींना देण्यासाठी १ चांगला पर्याय आहे. बाजारात खणाचे, सिल्कचे विविध रंगांचे आणि डिझाईन्सचे कापड मिळतात. याचा फ्रॉक, कुर्ता असे काहीही शिवात येऊ शकते.

हेअऱबँड, क्लिप्स, हेअर बो या गोष्टी तर मुलींना डझनावारी आणल्या तरी कमीच पडतात. छान फॅशनेबल हेअर अॅक्सेसरीज मुलींना भेट म्हणून देऊ शकतो.

गोष्टीची पुस्तके हा कोणत्याही वयोगटातील मुलींना देण्यासाठी १ उत्तम पर्याय आहे. मुली लहान असतील तर घरातले या गोष्टी वाचून दाखवू शकतात नाहीतर मुली स्वत:ही वाचू शकतात.

वॉटरबॅग आणि टिफिन बॉक्स हेही सतत लागत असल्याने छान कलरफुल असे खरेदी केल्यास मुली अतिशय आवडीने ते वापरतात.

शारीरिक हालचाल होईल अशा अॅक्टीव्हीटीजही स्वस्तात मस्त मिळतात त्या गिफ्टसाठी चांगले पर्याय होऊ शकतात.