पारंपरिक ठिपक्यांची रांगोळी ५ मिनिटांत काढा; पाहा आजी काढत असे तशा रांगोळ्यांच्या सुंदर डिजाईन्स By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:31 PM 2023-11-10T12:31:34+5:30 2023-11-10T13:10:35+5:30
Dots Rangoli For Diwali : दारासमोर ठिपक्यांची सिंपल रांगोळी ५ मिनिटांत काढा; ठिपक्यांच्या रांगोळ्यांच्या एक से एक डिजाईन्स, पाहा दिवाळीच्या (Diwali2023) दिवसांत रांगोळीशिवाय घराला शोभा येत नाही. मोठ्या रांगोळ्या काढणं सर्वांनाच जमतं असंल नाही. मोठ्या रांगोळ्या काढण्यासाठी बराचवेळही लागतो तर तुम्हाला आकर्षक रांगोळ्या काढायच्या असतील तर ठिपक्यांच्या रांगोळ्या ट्राय करू शकता. ठिपक्यांच्या रांगोळ्याच्या साध्या, सोप्या डिजाईन्स पाहूया. (Beautiful Small Rangoli)
आडवे-उभे १२-१२ ठिपके सगळ्यात आधी काढून नंतर फोटोत दाखवल्याप्रमाणे या लाईन्स जोडून घ्या. ही रांगोळी रंग भरल्यानंतर फारच आकर्ष दिसेल
रांगोळीमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही मेणाचे दिवे किंवा पारंपरिक मातीचे दिवे लावू शकता. या रांगोळीत तुम्हाला दिव्यांचे डिजाईन्स काढू शकता.
१५ आणि ८ ठिपके काढून तुम्ही अशी आकर्षक रांगोळी काढू शकता. फुलांमध्ये तुम्ही आवडीचे रंग भरू शकता.
ही सोपी रांगोळी तुम्ही देव्हाऱ्यासमोर किंवा तुळशीपुढे काढू शकता. फक्त ५ ठिपक्यांमध्ये ही रांगोळी काढून होईल.
४-७ असे ठिपके काढून तुम्ही आकर्षक रांगोळी काढू शकता. पतंगाप्रमाणे आलेल्या आकारात तुम्ही आवडीचे रंग भरू शकता.
१३ ते ७ ठिपके काढून ही रांगोळीची डिजाईन तुम्हाला काढता येईल.
ठिपक्यांच्या रांगोळ्या काढायला अत्यंत सोप्या असतात. पुस्तकात पाहून किंवा युट्यूबवर पाहून तुम्ही रांगोळ्या काढू शकता. (Image Credit- Social Media)