धूळ, ऊन, प्रदुषणामुळे त्वचा डल झाली? अभिनेत्री भाग्यश्री सांगते रोज प्या 'हे' पाणी, त्वचा होईल तुकतुकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2025 09:25 IST2025-03-13T09:21:42+5:302025-03-13T09:25:01+5:30
beauty tips shared by actress bhagyashree, tips and tricks for glowing skin, how to use kesar or saffron for glowing skin

आपल्या त्वचेला रोजच धूळ, ऊन, प्रदुषण या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मग त्वचेवर त्याचा परिणाम होऊन त्वचा निस्तेज होऊन काळवंडलेली दिसू लागते.(tips and tricks for glowing skin)
अशा त्वचेसाठी नेहमीच वरवरचे उपाय करून इलाज नसतो. कारण ते उपाय तात्पुरते असतात. म्हणूनच जर तुम्हाला त्वचा नेहमीसाठीच तजेलदार, तुकतुकीत व्हावी असं वाटत असेल तर अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे तो एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(beauty tips shared by actress Bhagyashree)
हा उपाय करण्यासाठी आपल्याला केशर वापरायचं आहे.(how to use kesar or saffron for glowing skin?)
केशराच्या १० ते १५ काड्या कोमट पाण्यामध्ये काही वेळ भिजत घाला आणि हे कोमट पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्या.
सलग १५ दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास त्वचेवर खूप छान चमक येईल असे भाग्यश्री सांगत आहे.
हा उपाय केल्यामुळे त्वचेला कोलॅजिन मिळते. त्यामुळे त्वचेचं तारुण्य टिकून राहण्यास मदत होते.