दिवाळीत दारासमोर काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन्स, कमी वेळात दार सजेल आकर्षक... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2023 04:50 PM 2023-11-09T16:50:36+5:30 2023-11-09T17:00:10+5:30
Easy and Simple Rangoli Designs for Diwali दिवाळी म्हटली की दारासमोर सुबक अशी रांगोळी काढणे ही आपली परंपरा. पण अनेकदा दारासमोर असणारी जागा आणि आपल्यातील कलात्मकता हे जुळून यावे लागते. त्यासाठीच दिवाळीच्या प्रत्येक दिवसासाठी काढता येईल अशा खास रांगोळी डिझाईन्स आज आपण पाहणार आहोत (Easy and Simple Rangoli Designs for Diwali).
वसुबारस हा दिवाळीच्या दिवसातील पहिला महत्त्वाचा दिवस. गायीची पूजा करुन आपण वर्षातील या मोठ्या सणाची सुरुवात करतो. त्यानिमित्ताने दारासमोर रांगोळी काढायची असेल तर असे गोमुख आपण नक्की ट्राय करु शकतो.
धनत्रयोदशी म्हणजेच धनाची पूजा. व्यापारी वर्गात हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. धनाचे प्रतिक असलेली नाणी रांगोळीमध्ये काढून आपण या सणाची रंगत वाढवू शकतो.
दिवाळीतील चौथा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीची म्हणजेच घरातील संपत्ती, धन, दागिने, केरसुणी यांची पूजा यानिमित्ताने केली जाते. येणाऱ्या वर्षात कुटुंबात लक्ष्मीचा वास राहावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
दिवाळी ४ ते ५ महत्त्वाच्या दिवसांची म्हणून ओळखली जात असली तरी एखाद्या दिवशी काहीच नसते त्याला आपण भाकड दिवस म्हणतो. त्या दिवशी झटपट होणारी अशी रांगोळी एखादी रांगोळी काढायची असेल तर पणत्या ठेवता येतील असा हा सोपा पर्याय आहे.
दिवाळी पाडवा हा दिवाळीतील आणखी एक मोठा सण. या दिवशी पतीला ओवाळून त्याच्या दिर्घायुष्यासाठी मागणी केली जाते. खास या दिवसाच्या निमित्ताने झटपट काढता येईल अशी आकर्षक डीझाईन.
भाऊबीज म्हणजे दिवाळीतील शेवटचा सण. एकमेकांचे रक्षण कर असे सांगणाऱ्या या नात्याचे सेलिब्रेशन करण्याचा हा दिवस.
तुळशीचे लग्न हाही दिवाळीत किंवा दिवाळीनंतर त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जाणारा खास दिवस. या दिवसाच्या निमित्तानेही दारात रांगोळी काढायची असेल तर असा झटपट-सोपा पर्याय तुम्ही नक्की ट्राय करु शकता.