गरबा खेळायला आवडतं पण डान्स येत नाही? पाहा गरब्याच्या सोप्या बेसिक स्टेप्स; मनसोक्त नाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 04:57 PM2023-10-12T16:57:56+5:302023-10-12T17:50:17+5:30

Easy Garba Steps For Beginners : गरब्याच्या निमित्ताने नवीन लोकांशी बोलता आणि सणाचा आनंद घेता.

नवरात्रीत गरबा, दांडीयांची खूप क्रेझ पाहायला मिळते. अनेकांना हौस असते पण गरबा खेळायला जमत नाही. गरबा सोप्या पद्धतीने कसा खेळतात, गरबा खेळण्याच्या बेसिक टिप्स पाहूया. जेणेकरून तुम्ही कोणाचीही मदत न घेता परफेक्ट गरबा करू शकता. (3 Easy Garba Steps For Beginners

नऊ रात्रीच्या ९ दिवसांत लोक सुंदर घागरा चोळी, दागिने परिधान करून आपल्या मित्र मैत्रिणींसोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतात. गरबा खेळण्याच्या बेसिक स्टेप्स पाहून तुम्ही सुद्धा घरात गरब्याचा सराव करू शकता.

१५ मिनिटं मध्यम वेगानं गरबा केल्याने तुम्ही १०० ते १५० कॅलरजी बर्न करू शकता. गरबा करता करता तुम्ही ५००-७०० कॅलरीज बर्न करू शकता. हे वेगावर अवलंबून आहे.

गरबा खेळल्याने मेंदू आणि पायांनाही उर्जा मिळते. यामुळे तुम्ही सकारात्मक विचार करू लागता. हा उपाय केल्याने मेडिटेशनपेक्षाही चांगला रिजल्ट दिसून येतो.

गरबा टिमवर्कचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. यामुळे उत्साह आणि शिस्त दोन्हीचे वातावरण असते.

नऊ दिवस सतत एका ग्रुपबरोबर गरबा खेळल्याने चांगला दृष्टीकोन तयार होतो आणि करियरमध्येही याचा फायदा होतो. यादरम्यान तुम्ही शांतपणे एकमेकांचे म्हणणे समजून घेऊन काम करता

गरबा खेळताना तुम्ही मोबाईल, टिव्ही,लॅपटॉप यांसारख्या वस्तूंपासून दूर राहता. गरब्याच्या निमित्ताने नवीन लोकांशी बोलता आणि सणाचा आनंद घेता.

गरबा खेळणं हा चांगला व्यायाम आहे. यामुळे शरीर एक्टिव्ह राहते आणि मानसिक समाधानही मिळते.

ऑफिसमध्ये किंवा बिल्डींगच्या टेरेसवर तुम्ही गरब्याचे आयोजन करणार असाल किंवा दांडीया डान्समध्ये सहभाग घेणार असाल तर तुम्ही या स्टेप्स ट्राय करु शकता

(Image Credit- Pebbles in gujarati)