स्टिलच्या डब्यातून भाजीचं सगळं तेल बाहेर येतं? ४ टिप्स, घट्ट लागेल डबा, १ थेंबही तेल सांडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 08:53 PM2024-05-29T20:53:25+5:302024-05-30T14:01:26+5:30

Easy Hacks How To Stop Vegetable Oil : जर घरात रबर उपलब्ध असतील तर तुम्ही १० ते १२ रबर घेऊन ते तोडा आणि एकत्र बांधा.

नेहमी असं होतं की स्टिलच्या डब्यात कोणताही पदार्थ भरल्यानंतर त्यातून तेल बाहेर येतं. लहान मुलांना किंवा मोठ्या टिफिनमध्ये कोणतीही भाजी दिली तर त्यातून तेल बाहेर येतं. स्टीलच्या डब्यातून भाजीचं तेल बाहेर येतं आणि टिफिन तेलकट होतो. अनेकदा टिफिनमधून तेल बाहेर आल्याने टिफिनची बॅग आणि कपडेसुद्धा खराब होतात. काही सोपे हॅक्स फॉलो करून तेल बाहेर येणं रोखू शकता.

आजकाल एअर टाईट टिफिनमधूनही तेल बाहेर येण्याचा धोका असतो. पण स्टिल किंवा बिना एअर टाईट डब्यात जास्त रिस्क असते. लंच बॉक्स हलका वाकडा तिकडा झाल्याने भाजीतून तेल बाहेर येऊ लागतं.

तेल बाहेर येऊ नये यासाठी तुम्ही फॉईल पेपरचा वापर करू शकता. यासाठी मोठा एक फॉईल पेपर घेऊया. एक फॉईल पेपर चार भागांमध्ये बरोबर विभागून घ्या.

टिफिनमध्ये भाज्या ठेवल्यानंतर फॉईल पेपर चार तुकड्यांना ठेवून व्यवस्थित बांधून घ्या. फॉईल पेपरमध्ये भांड्यामध्ये टिफिनचं झाकण बंद केल्याने थोडं बाहेर ठेवा.

फॉइल पेपरचे चारही तुकडे इतके मोठे असावेत की टिफिनचे झाकण बंद करूनही ते थोडेसे बाहेरच राहतील. जेणेकरुन झाकण बंद होते जसे की ते पॅक एअर टाईट आहे. अशा प्रकारे तुमच्या भाजीचे तेल निघणार नाही आणि टिफिन घाण होणार नाही

जर घरात रबर उपलब्ध असतील तर तुम्ही १० ते १२ रबर घेऊन ते तोडा आणि एकत्र बांधा त्यानंतर हे रबर व्यवस्थित बांधून डब्याच्या झाकणाला बांधा जेणेकरून व्यवस्थित पॅक राहील.

नंतर पाणी टिफिनमध्ये भरून चेक करा पाणी बाहेर येत नाही याची काळजी घ्या. जर पाणी बाहेर येत असेल तर त्यातून तेलही बाहेर येईल. जर पाणी बाहेर येत असेल तर काहीतरी उपाय त्वरीत करा.