डोळ्यांवर कुणी पॅक लावते ? लावा नॅचरल घरगुती आय पॅक, डोळे दिसतील सुंदर - जळजळही होईल कमी... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 08:53 PM 2024-06-27T20:53:15+5:30 2024-06-27T21:04:30+5:30
8 Home Remedies To Keep Dark Circles Away : How to Get Rid of Dark Circles Permanently : Eye Pack For Eyes : डोळ्यांना आय पॅक लावून वाढवा डोळ्यांचे सौंदर्य... आपले डोळे सुंदर व आकर्षक दिसावेत असे सगळ्यांनाच वाटत असते. चेहेऱ्यासोबतच डोळ्यांची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. परंतु सध्याची बदलती लाईफस्टाईल, स्ट्रेस यांसारख्या इतर कारणांमुळे आपण डोळ्यांचे नैसर्गिक सौंदर्य हरवून बसतो. अशावेळी डोळे सुजणे, लाल होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे अशा डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होतात. डोळ्यांच्या या समस्यांमुळे त्यांचे सौंदर्य रंगहीन होते. अशा परिस्थितीत, आपण डोळ्यांसाठी अनेक प्रकारचे कॉस्मॅटिक्स किंवा क्रिम, लोशन लावतो. परंतु या कृत्रिम उपायांपेक्षा आपण घरच्याघरी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करु शकतो. घरातल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून आपण डोळ्यांसाठी आय पॅक बनवू शकतो. अशाच काही आय पॅकबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतील(Easy Home Remedies To Get Rid Of Dark Circles).
१. काकडी आय पॅक :- काकडीचे तुकडे करा आणि डोळ्यांवर १५ ते २० मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्यांची सूज कमी होऊन त्यांना थंडावा मिळेल. काकडीत व्हिटॅमिन 'सी' असते, त्यामुळे त्वचेला चमक येते आणि काळसरपणा कमी होतो.
२. ग्रीन टी आय पॅक :- ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणांत अँटीऑक्सिडंटस असतात. डोळ्यांना तजेलदार ठेवण्यासाठी ग्रीन टी बॅग्ज वापरल्यानंतर त्या फ्रिजरमध्ये ठेवा आणि त्या थंड झाल्यानंतर डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळून थकवा दूर होतो.
३. एलोवेरा जेल पॅक :- एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन 'ई' आणि 'सी' असते, ज्यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचा हायड्रेटेड राहते. डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेवर एलोवेरा जेल लावा आणि १५ मिनिटे असेच सुकू द्या. यानंतर डोळे थंड पाण्याने धुवा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल आणि थंडावा मिळेल.
४. टोमॅटो आय पॅक :- टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. जे डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करतात. यासाठी टोमॅटोचा रस काढा, त्यात थोडे गुलाबपाणी घाला आणि या मिश्रणात आयपॅड्स बुडवून डोळ्यांवर १० ते १५ मिनिटे ठेवून द्या. यानंतर डोळे थंड पाण्याने धुवा.
५. दही व हळद पॅक :- एक चमचा दह्यात चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर लावा आणि १५ ते २० मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवा. यामुळे तुमची डार्क सर्कलची समस्या कमी होईल.
६. दूध व मध पॅक :- एक चमचा थंड दूध आणि एक चमचा मध एकत्र करून मिश्रण तयार करा. या मिश्रणात कॉटन पॅड बुडवून डोळ्यांवर १५ ते २० मिनिटे ठेवा. नंतर थंड पाण्याने डोळे धुवा. यामुळे डोळ्यांची त्वचा मऊ होऊन डोळे तजेलदार दिसतील.
७. गुलाब पाणी :- गुलाब पाणी हे एक अतिशय चांगले नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जर डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा कोरडी झाली असेल तर गुलाब पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. कापसाचे पॅड गुलाब पाण्यात भिजवा आणि डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांची सूज तर कमी होईलच शिवाय त्यांना थंडावाही मिळे
८. बटाटा आय पॅक :- बटाट्यामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. जर डार्क सर्कल्समुळे डोळे खराब दिसत असतील तर बटाट्याचा आय पॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. कच्चे बटाटे सोलून त्याचे पातळ काप करुन डोळ्यांवर ठेवा. याचबरोबर बटाट्याचा रस करुन तुम्ही तो देखील डोळ्यांभोवतीच्या त्वचेला लावू शकता. यामुळे त्वचा चमकदार आणि डागरहित दिसेल.