Easy tricks to look tall in a saree : साडीत उंच, स्लिम दिसण्यासाठी ६ ट्रिक्स; चारचौघात उठून दिसेल परफेक्ट साडी लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 04:58 PM2022-03-02T16:58:07+5:302022-03-02T17:17:04+5:30

Easy tricks to look slim and tall in a saree : साडीत उंच दिसण्यासाठी कमी उंचीच्या महिलांसाठी ६ ट्रिक्स; अशी साडी नेसाल चारचौघात उठून दिसाल

काळ बदलला असून महिलांमध्ये वेस्टर्न ड्रेस घालण्याची क्रेझही वाढली आहे. मात्र आजही महिलांचे साडीबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही. (Saree styling Tips) प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये किमान एक साडी असलीच पाहिजे. साडी नेसल्यानंतर सौंदर्यासोबतच एक वेगळा स्मार्टनेसही महिलांमध्ये येतो. (Tricks to look slim and tall in a saree) पण ज्या महिलांची उंची कमी आहे, त्या साडीप्रेमी असूनही साडी नेसण्यास कचरतात. (How to drape saree perfectly)

वास्तविक, कमी उंचीच्या महिलांनी साडी नीट नेसली नाही तर त्यांची उंची आणखी कमी दिसते. पण बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांची उंची जास्त नाही (Tips to look slim and tall in a saree) तरीही जेव्हा त्या साडी नेसतात तेव्हा ती उंच आणि सुंदरही दिसतात.जर तुमची उंचीही कमी असेल आणि तुम्ही लवकरच लग्न करणार असाल तर साहजिकच लग्नानंतर तुम्हाला कधीतरी साडी नेसावीच लागेल. (How to look tall in saree)

अशा स्थितीत काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे साडीमध्ये उंच आणि सुंदर दिसू शकता. यासाठी सेलिब्रिटी ब्युटी आर्टिस्ट आणि साडी ड्रेपिंग एक्स्पर्ट पूनम चोग यांनी दिलेल्या टिप्स वापरून तुम्ही साडीत उंच आणि सुंदर दिसू शकता.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची उंची ५ फूट ३ इंच आहे. या फोटोमध्ये आलियाने लाल नेटची साडी परिधान केली आहे. जर तुमची उंची ५ फूट ते ५ फूट ३ इंच असेल तर तुम्ही गडद रंग निवडावा. गडद रंगांच्या साडीमध्ये तुमची उंची अधिक दिसेल. .

जर साडीत जास्त रंग असतील तर त्यात तुमची उंची कमी दिसू शकते. गडद रंगात तुम्ही नेव्ही ब्लू, ब्लॅक, रेड, मरून, ब्राऊन आणि गडद हिरवा रंग निवडू शकता. यासोबतच कमी उंचीच्या महिलांनी कॉटनच्या साड्या नेसू नयेत, तसेच कडक फॅब्रिकच्या साड्या निवडू नयेत. तुम्ही सिल्क, सॉफ्ट नेट, जॉर्जेट आणि शिफॉनच्या साड्या घालू शकता.

जर उंची कमी असेल तर गळ्यात कमी डीपलाईनचे किंवा चौकोनी ब्लाउज घालू नयेत. तुम्ही लांब बाह्यांचे आणि गोल गळ्याचे ब्लाऊज घालू शकता.

जर तुमचे आर्म फॅट खूप जास्त असेल तर लांब बाह्यांच्या ब्लाऊजने ते झाकले जाईल आणि तुम्ही सुंदर दिसाल. साडीसोबत डीप राउंड नेक, व्ही-नेकलाइन, प्लंगिंग नेकलाइन किंवा टर्टल नेकलाइनचा ब्लाउज घालावा. ब्लाउजचा मागचा भागही उघडा असावा हेही लक्षात ठेवा. यासोबतच ब्लाउज फुल स्लीव्हड असेल तर साडीमध्ये तुमची उंची अधिक दिसेल.

जर तुम्ही जाड असाल तर बारीक आणि उंच दिसण्यासाठी पेटिकोटची निवडही खूप महत्वाची असते. बॉडी फिटींग पेटिकोट वापरल्यास तुमच्या कंबरेखालचा भाग बारीक दिसतो आणि साडी चापून चोपून बसते. या पेटिकोटचे कापडही आरामदायक असते. त्यामुळे तुम्ही कितीही वेळ असं ब्लाऊज वेअर करू शकता.

साडीसोबतच तुमची ज्वेलरी आणि मेकअपही खूप महत्त्वाचा असतो. कमी उंचीच्या महिलांनी साडीसोबत कमीत कमी दागिने घालावेत. तसेच, तुम्ही लांब कानातले, लांब बिंदी आणि पफ हेअरस्टाइल निवडावी. यासोबतच पेन्सिल हील्स किंवा ब्लॉक हील्स घालू नयेत. साडीची उंची एकसारखी ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म हील्स सर्वोत्तम आहेत, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेज हील्स देखील घालू शकता.

साडीमध्ये तुम्हाला उंच दिसायचं असेल तर केस मोकळे सोडणं टाळा. त्यामुळे तुम्ही फार उंच दिसणार नाही. उंचीच्या हिशोबानं तुम्ही केसांचा पफ काढून हाय बन किंवा पफ काढून कर्ल्स हेअर्सची स्टाईल करा. जेणेकरून तुमची उंची अधिक चांगली दिसेल.