एक संत्री आठ फायदे - केसांची होईल वाढ, हृदयाच्या गंभीर आजारांचाही टळेल धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 02:48 PM2022-11-13T14:48:49+5:302022-11-13T15:01:52+5:30

Benefits of Oranges संत्र्याला सुपरफूड म्हटले जाते. पण असे का म्हणतात माहीत आहे का? संत्र्यामध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत

संत्री हा फळ प्रत्येकाला आवडते. संत्र्याचा ज्यूस, मिठाई, बर्फी, हलवा, असे अनेक प्रकार संत्र्यापासून बनवले जातात. संत्र्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. हिवाळ्यात रोज संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दीपासून संरक्षण ते त्वचा सुंदर बनवण्यापर्यंत संत्री मदत करते . संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. म्हणूनच ते खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते यासह वजन कमी करण्यासाठी संत्र्याची मदत होते. संत्र्याचे अजून किती फायदे आहेत जाणून घेऊयात..

संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे संत्री खाल्ल्याने संसर्गजन्य आजार टाळता येतात आणि सर्दीचा त्रास होत नाही. यासाठी हिवाळ्यात रोज एक संत्री खाल्ले पाहिजे.

संत्री खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसत नाही. सुरकुत्या, हनुवटी आणि बारीक रेषा दिसत नाहीत. दररोज संत्र्याचा रस प्यायल्याने त्वचेवर एक चमक येते.

संत्री खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. जर आपणास डोळ्यांशी संबंधीत तक्रारी असतील, तर रोज संत्री खाण्याची किंवा संत्र्याचा रस पिण्याची सवय लावा. आपल्याला लवकरच फरक जाणवू लागेल. आणि शरीरासाठी देखील उत्तम ठरेल.

संत्री आपल्या हृदयाच्या आरोग्याचीही काळजी घेते. यासह रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्यामुळे बीपीचा त्रास होत नाही आणि हृदयावर ताणही येत नाही.

रोज संत्री खाल्ल्याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो. म्हणूनच डॉक्टर रोज संत्री खाण्याचा सल्ला देतात. यातील मुख्य घटक शरीरातील आजार दूर ठेवण्यास मदत करते.

अनेकांना पोटाशी संबंधित समस्या असतात. त्या समस्या दूर करण्यासाठी संत्र्याचा नियमित आहारात समावेश करा. सायंकाळची जरी छोटी भूक लागत असली, बाहेरचं खाण्यापेक्षा आपण संत्री खाऊ शकता. संत्री खाल्ल्याने अपचनाचा त्रास होत नाही.

आपल्याला किडनी स्टोनची समस्या असेल तर दररोज संत्री आणि त्याचा रस सेवन करणे फायदेशीर मानले जाते. हे स्टोन बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते.

हिवाळ्यात केस गळण्याच्या समस्या महिलांमध्ये अधिक दिसून येते. केस खूप गळत असतील किंवा पातळ होत असतील तर संत्री खाणे फायदेशीर ठरू शकते. हे तुम्हाला केसांच्या समस्येपासून मुक्ती देखील देऊ शकते. रोज संत्र्याचा रस प्यायल्याने केस दाट आणि रेशमी होतात.