expert suggests what happens to the body when you shift your dinner time from 9 pm to 6 pm
रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ वाजता जेवल्याने तब्येतीवर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात ४ कारणं By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 04:47 PM2024-09-20T16:47:07+5:302024-09-20T16:55:09+5:30Join usJoin usNext रात्रीचं जेवण सायंकाळी ७ वाजता झालंच पाहिजे, असं अनेक आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात. रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये ३ तासांचा गॅप असायलाच पाहिजे, असं आपण वारंवार ऐकतो. (expert suggests what happens to the body when you shift your dinner time from 9 pm to 6 pm) आता तर बरेच सेलिब्रिटीसुद्धा रात्रीचं जेवण सायंकाळीच करत असल्याचे आपण ऐकत आहोत. त्यात अनुष्का शर्मा, विराट कोहली, अक्षय कुमार, काजोल यासारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. आता रात्रीच्या जेवणाची वेळ आणि ९ वरून ६ वर आणतो, तेव्हा आपल्या तब्येतीवर नेमका कोणता परिणाम होतो, याविषयीची माहिती तज्ज्ञांनी सांगितली आहे. journal Nutrients यांनी २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार रात्री उशिरा जेवल्याने मेटाबॉलिझम बिघडते. त्याचा परिणाम रक्तातील सााखरेचे प्रमाण वाढण्यावर होतो. जर आपण सायंकाळी ६- ७ वाजेपर्यंत जेवत असू तर त्यामुळे रक्तातील साखरेचे तसेच इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. याविषयी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना डॉ. श्रीनिवासन सांगतात की सायंकाळी जेवल्यामुळे अपचन, ॲसिडीटी, छातीत जळजळ होणे, असे त्रास होत नाही. तुमची एनर्जी लेव्हल वाढण्यास मदत होते. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने चयापचय क्रिया, पचन क्रिया बिघडते. त्यामुळे वजन भराभर वाढते. सायंकाळी लवकर जेवण करून त्यानंतर ३ ते ४ तासांच्या गॅपने तुम्ही झोपलात तर झोप शांत लागते. टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सअन्नWeight Loss TipsFitness Tipsfood