Family planning Tips : दोन मुलांच्या जन्मात किती अंतर हवं? उशिरा किंवा लवकर गर्भधारणा झाल्याचे तोटे काय ? By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:36 PM 2021-07-29T13:36:20+5:30 2021-07-29T14:37:26+5:30
Family planning Tips : महिलांमध्ये वेळेआधीच्या गरोदरपणामुळे वाढलेलं वजन कमी न होणं, पाणी कमी होणं, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, मानसिक स्थितीत बदल होणं, बाळाची काळजी घेण्यास अडचण अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एक किंवा एकापेक्षा जास्त मुलं जन्माला घालत असताना पालकांना वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. काहीजणांना आपल्या दोन मुलांमध्ये जास्त अंतर नको असते. दोन्ही मुलांचे एकत्रच संगोपन केलं जावं अशी त्यामागची भावना असते. तर काहीजणांना दोन मुलांमधील अंतर जास्त असावं असं वाटतं कारण त्यांना दोन्ही मुलांसह त्यांच्या बालपणाचा आनंद घ्यायचा असतो.
कुटुंब कसं वाढवावं हा पूर्णपणे पालकांचा निर्णय असतो. पण कमी वयात किंवा जास्त वयात प्रेग्नंसीचे काही फायदे तोटेही आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी यााबाबत सल्ला दिला आहे.
लवकर गर्भधारणा झाल्यास वाढणारे धोके तुम्ही किंवा तुमच्या पार्टनरचं वय कमी असेल आणि तुम्ही कुटुंब वाढवण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची खास काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता २०१८ च्या एका अभ्यासानुसार २ गर्भधारणेदरम्यान १२ महिन्यांपेक्षा कमी अंतर असणं अनेक आजारांचं कारण ठरू शकतं. वेळेआधी गर्भधारणा झाल्यास आईच्या जीवाला धोका असतो.
अभ्यासानुसार दोन प्रेंग्नंसीमध्ये कमीत कमी १८ महिन्यांचे अंतर असायला हवं. काही आरोग्य तज्ज्ञ १८ ते २४ महिने अंतर ठेवण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वेळेआधी दुसरी प्रेंग्नंसी झाल्यास बाळाचं वजन कमी होऊ शकतं.
खासकरून जेव्हा पहिलं मुल ऑपरेशननं झालेलं असतं आणि त्यानंतर बाळासाठी प्लॅनिंग केलं जातं. तेव्हा बाळाच्या आईच्या आरोग्याला धोका असतो. कारण पहिल्यावेळीचे ऑपरेशनचे टाके व्यवस्थित सुकलेले नसतात. त्यामुळे मोठी समस्या निर्माण येऊ शकते.
महिलांमध्ये गरोदरपणामुळे वाढलेलं वजन कमी न होणं, पाणी कमी होणं, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, मानसिक स्थितीत बदल होणं, बाळाची काळजी घेण्यास अडचण अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन मुलांमध्ये किती अंतर असावं हे आई वडिलांच्या वयासह त्यांच्या आर्थिक सामाजिक स्थितीवरही अवलंबून असतं. १८ महिन्यांपेक्षा कमी अंतरावर गर्भधारणा झाल्यास मुलांना सांभाळणं पालकांसाठी आव्हान ठरू शकतं.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंब नियोजन करताना पालकांनी कोणत्याही सामाजिक, कौटुंबिक दबावाला बळी पडू नये.
पालकांनी आपली मानसिक, आर्थिक, शारीरिक स्थिती पाहून प्रेग्नंसीचं प्लॅनिंग करायला हवं. (Image Credit-