Fashion With Spects: Top 10 partywear look with spects, You can look stylish with spects also..
चष्म्याचा कॉम्प्लेक्स कशाला? चष्मा लावूनही दिसू शकता स्टायलिश.. बघा 'फॅशन विथ चष्मा'चे १० आकर्षक लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 05:36 PM2022-05-18T17:36:11+5:302022-05-18T17:41:58+5:30Join usJoin usNext १. मेकअप केल्यानंतर किंवा एखाद्या पार्टीला जाताना चष्मा घालण्याचा कंटाळा येतो, खूप कॉम्प्लेक्स येतो... पण असं वाटून घेण्याची मुळीच गरज नाही. कारण हे बघा फॅशन विथ चष्माचे १० आकर्षक पर्याय.. २. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. एखाद्या लग्नाला किंवा समारंभाला जाताना अशा पद्धतीचा चष्मा आणि हलका मेकअप नक्कीच तुम्हाला स्टायलिश लूक देऊ शकतो. . ३. साडी नेसूनही चष्मा लावल्यानंतर तुम्ही अतिशय आकर्षक दिसू शकता. राणी मुखर्जी आणि कंगणा यांचे हे फोटो बघा.. सोबर साडी विथ सोबर चष्मा असा लूक केला की नक्कीच तो आकर्षक दिसतो. ४. फॅशनिस्टा सोनम कपूरचा हा एक लूक असाच एक खास.. मोठी टिकली, मोठे गळ्यातले आणि त्यावर लावलेला चष्मा तिला अतिशय सूट होतो. ५. ऐश्वर्या रायचा हा बघा एक पार्टी लूक.. चष्मा लावूनही ती किती आकर्षक दिसते आहे, असाच स्टायलिश लूक तुम्हालाही जमू शकतो. ६. श्रद्धा कपूरचा हा पार्टी लूक चष्म्यामुळे अधिक आकर्षक दिसतो आहे.. त्यामुळे पार्टीला जाताना चष्मा लावण्याबाबत कॉम्प्लेक्स वाटून घेण्याची काहीही गरज नाहीच.. ७. किरण रावदेखील तिच्या चष्म्यामध्ये नेहमीच स्मार्ट दिसते. साडी घातलेला ट्रॅडिशनल लूक असो किंवा मग वेस्टर्न लूक.. ती नेहमीच चष्मा अतिशय आत्मविश्वासाने घालते. ८. विद्या बालनचा हा चष्मा तिला अधिक मॅच्युअर लूक देणारा ठरला आहे.. कधीकधी आपल्या व्यक्तिमत्वाची इतरांवर छाप टाकण्यासाठी चष्मा खूप मदत करतो. ९. एखाद्या पार्टीसाठी किंवा लग्नसमारंभासाठी तयार झाल्यावर अशा पद्धतीने चष्मा लावणं नक्कीच कॅची दिसू शकतं. १०. चष्मा लावणंही खूप गोड, लाघवी दिसू शकतं.. त्यासाठी फक्त आपलं ड्रेसिंग आणि चष्माच्या रंग, आकार या गोष्टी अशा प्रकारे परफेक्ट मॅच झाल्या पाहिजेत. टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनसेलिब्रिटीBeauty TipsfashionCelebrity