तुम्ही पाहिले का हे संक्रांत स्पेशल पतंग कानातले? पतंगबाजीच्या दिवसांत थीमनुसार करा मस्त फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2025 17:24 IST2025-01-16T17:18:31+5:302025-01-16T17:24:34+5:30

मकर संक्रांत म्हणजे पतंगबाजीचा उत्सव. आता संक्रांतीच्या दिवशी भरपूर पतंग उडवले असले तरी मकर संक्रांत ते रथसप्तमी हा संक्रांतीचा काळ मानला जातो. या दिवसांमध्ये तिळगुळ वाटप, हळदी- कुंकू आणि पतंगबाजी केली जाते.

म्हणूनच आता सध्या या दिवसांना शोभेल असे सुंदर पतंग कानातले बघा..

या दिवसांत अशा पतंगाचा आकार असणाऱ्या कानातल्यांना खूपच मागणी असते..

पतंग आणि मांज्याची चक्री असं युनिक डिझाईन असणारं हे कानातलं अगदी पाहताक्षणीच मन जिंकून घेणारे आणि एकदम वेगळं आहे..

सगळ्यांपेक्षा वेगळे दागिने, वेगळा लूक करण्याची आवड असेल तर लगेच हे असे पतंग कानातले घ्या.. सगळेच जण तुमच्या स्टाईलचं आणि विशेष म्हणजे थीमनुसार दागिन्यांची निवड करण्याच्या कौशल्याचं कौतूक करतील.

असे पतंग कानातले तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमध्ये तसेच ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही खरेदी करू शकता.

साडीच्या रंगानुसार तुम्ही अशा पद्धतीच्या कानातल्यांची निवड करू शकता. काही ऑनलाईन शॉपिंग साईटवर तर असे कानातले कस्टमाईजही करून देतात.

पतंग कानातल्यांचं हे आणखी एक सुंदर आणि नाजूक डिझाईन पाहा..