Fitness influencer : बापरे! जास्त घाम येतो म्हणून फिटनेस मॉडेलनं ऑपरेशन केलं; काही दिवसातच घडलं असं काही.....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 01:26 PM2021-07-16T13:26:01+5:302021-07-16T13:56:53+5:30

Fitness influencer dies : हा उपचार सुरक्षित असल्याचं मेनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेही होते. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे.

शरीरातून सतत बाहेर असलेल्या घामाला कंटाळून फिटनेस मॉडेलनं ऑपरेशन करायचं ठरवलं. पण या ऑपरेशननंतर लोकप्रिय मॅक्सिनक फिटनेस इन्फ्लूएंसर आणि बॉडी बिल्डरला मृत्यूचा सामना करावा लागला. ओडालिस सँटोस मेना या तरूणीनं ऑपरेशन केल्यानंतर लगेचच काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

२३ वर्षीय फिटनेस मॉडेल ओडालिस सँटोस मेना फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध होती. तिचे सोशल मीडियावर १ लाख ४७ हजार फोलोअर्स होते. ती नेहमीच तिची आकर्षक शरीरयष्टी आणि फिटनेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची.

रिपोर्ट्सनुसार ग्वाडलजारामधील स्किनपील क्लिनिकद्वारे मिराड्राय नावाच्या एका एंटीपर्सपिरेंट उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही तरूणी तिथे भरती झाली होती. तिथे तिचं ऑपरेशन करण्यात आलं पण ते अयशस्वी ठरलं.

या प्रक्रियेत घामाच्या ग्रंथींना हिट एनर्जी टेक्निकचा वापर करून ऑपरेशननं काढून टाकलं जातं. त्यानंतर अंडरआर्म्समध्ये घाम येत नाही. शरीरातील घाण, विषारी पदार्थ कमी होतात. अनेकदा काखेतील केसही कमी होतात.

हा एंडोर्समेंट स्टंट तरूणीला खूप महागात पडला तिला कार्डिएक अरेस्टचा सामना करावा लागला. त्यानंतर लगेचच फिटनेस मॉडेल मेनाचा मृत्यू झाला. या दरम्यान डॉक्टरांनी आणि सीपीआरच्या माध्यमातून या तरूणीला श्वास देण्याचा प्रयत्न केला पण ते तिचा जीव वाचवू शकले नाही.

हा उपचार सुरक्षित असल्याचं मेनानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेही होते. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार फिटनेस मॉडल आणि बॉडी बिल्डर मेना नेहमी बॉडी बिल्डींग स्पर्धांमध्ये सक्रिय असायची. २०१९ मध्ये तिनं हरक्यूलिसचा किताब जिंकण्याबरोबरच वेलनेस फिटनेल जुवेनाईल स्पर्धा सुद्धा जिंकली होती. (Image Credit- Instagram)