Fitness tips by actress Bhagyashree, Benefits of doing Vrikshasana regularly
फिट राहण्यासाठी रोज करा वृक्षासन, अभिनेत्री भाग्यश्रीही करतेय हे योगासन! वृक्षासनाचे फायदे ५ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 08:11 AM2022-11-02T08:11:33+5:302022-11-02T08:15:02+5:30Join usJoin usNext १. अभिनेत्री भाग्यश्री दर आठवड्यात तिच्या चाहत्यांसोबत काही फिटनेस टिप्स शेअर करत असते. फिटनेस, व्यायाम यासाठी तिच्या चाहत्यांना मोटीव्हेट करण्यासाठी या गोष्टींचा खरोखरच खूप उपयोग होतो.. २. आता दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर अनेक जणांचं नाॅर्मल रुटीन आताच कुठे सुरू झालंय. सुटीमध्ये आळसावलेल्या शरीराला पुन्हा एकदा व्यायामाची सवय लागावी, यासाठी वर्कआऊटची सुरुवात सावकाश होणं गरजेचं आहे. ३. त्यामुळेच या आठवड्यात भाग्यश्रीने एक सोपे योगासन सांगितले आहे. तिने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये ती वृक्षासन करताना दिसते आहे. वृक्षासन का करावं, त्याने कोणते फायदे होतात, याविषयीही ही काही माहिती. ४. वृक्षासन केल्यामुळे पायांचे स्नायू मजबूत बनतात. ५. शरीराचे उत्तम बॅलेंसिंग जमण्यासाठी वृक्षासन करणे फायद्याचे ठरते. ६. मन एकाग्र होण्यासाठी वृक्षासनाची मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही हे आसन नियमितपणे केले पाहिजे. ७. सायटिकाचा त्रास कमी करण्यासाठी वृक्षासन उपयुक्त ठरते. ८. वृक्षासन नियमितपणे केल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते.टॅग्स :फिटनेस टिप्सभाग्यश्रीव्यायामयोगासने प्रकार व फायदेFitness TipsBhagyashreeExerciseYoga