जेवल्यानंतर अजिबात करु नका ५ गोष्टी; पोट बिघडेल-वजनही वाढेल, पोटाचे त्रास टाळायचे तर.. By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:39 AM 2023-09-14T11:39:03+5:30 2023-09-14T11:56:07+5:30
Five Things You Should Never Do After a Meal : जेवल्यानंतर अनेकांना कपभर चहा पिण्याची सवय असते. यामुळे फ्रेश वाटतं असा लोकांचा समज असतो. पण यामुळे अन्न पचण्यात अडथळे येतात. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांच्या जेवणाच्या वेळा चुकतात, वेळेवर जेवण न केल्यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर कोणत्या गोष्टी करणं टाळायचं जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही आणि पचनक्रिया व्यवस्थित राहिल. (Health Tips)
जेवल्यानंतर अनेकांना कपभर चहा पिण्याची सवय असते. यामुळे फ्रेश वाटतं असा लोकांचा समज असतो. पण यामुळे अन्न पचण्यात अडथळे येतात.
जेवल्यानंतर बसून राहणं खूप चुकीचं आहे. यामुळे फक्त वजन वाढत नाही तर पचनक्रिया सुद्धा बिघडते. तर जेवल्यानंतर चालण्याची सवय असायला हवी.
जेवणानंतर जवळपास १ तास चहा किंवा कॉफी घेऊ नये. यामुळे पोषक तत्वांची कमतरता उद्भवते.
जेवल्यानंतर लगेचच जास्त पाणी प्यायल्यामुळे एसिड पातळ होऊन पचन क्रियेवर परिणाम होतो. खाल्लेल्या अन्नाचं वेगानं पचन होत नाही.
जेवल्यानंतर लगेच कोणताही व्यायाम करू नये. यामुळे गॅस, सुस्ती येणं, ढेकर येणं असा त्रास उद्भवतो. म्हणून जेवल्यानंतर अर्धा ते १ तास गॅप ठेवून व्यायाम करायला जावे.
जेवल्यानंतर जर तुम्ही दात घासत नसााल दात आणि हिरड्या यामुळे कमकुवत होऊ शकतात. जेवल्यांतर दातांमध्ये अन्न अडकते त्यामुळे आजार पसरण्याचा धोका असतो.
जेवून लगेच बेडवर झोपणं ही चुकीची सवय आहे. यामुळे छातीत जळजळ एसिड रिफ्लेक्सचा त्रास होऊ शकतो. अन्न पचनाच्या क्रियेत बाधा येते.