दिवाळीत 'ही' फुलं वापरून करा सुंदर फ्लॉवर डेकोरेशन, ५ आकर्षक डिझाईन्स- घरभर दरवळेल फुलांचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 04:04 PM2024-10-25T16:04:23+5:302024-10-25T16:10:49+5:30

दिवाळीमध्ये आपण दारासमोर रांगोळी तर नेहमीच काढतो. पण त्याऐवजी काही फुलं वापरून सुंदर फ्लॉवर डेकोरेशनही करू शकतो. यामुळे नक्कीच तुमच्या घराची सजावट इतरांपेक्षा जास्त आकर्षक आणि सुंदर वाटेल.

दिवाळीत झेंडू, शेवंती ही फुलं बाजारात भरपूर प्रमाणात असतात. त्यांचा वापर मरून अशी आकर्षक पुष्परचना करता येईल.

तुम्हाला जर कमळाचं फुल मिळालं तर त्याचा वापर करून अशी छानशी रचना करता येईल. घराच्या मुख्य द्वाराशी तुम्ही अशी रचना करून ठेवू शकता.

दिवाळीत आपण घरभर पणत्या लावतो. त्या नुसत्याच जमिनीवर ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीची रचना करून ठेवल्यास ते अधिक आकर्षक वाटेल. यासाठी तुम्ही मोगरा, जाई, जुई, कुंदा अशी फुलं वापरू शकता.

गुलाबाच्या पाकळ्या वापरून यासारख्या अनेक आकर्षक डिझाईन्स करता येऊ शकतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा गर्द गुलाबी रंग नेहमीच पाहणाऱ्याच्या नजरेला सुखावणारा असतो.

तुमच्याकडे कमळ, गुलाब, झेंडू, शेवंती अशी सगळीच फुलं भरपूर प्रमाणात असतील तर अशा पद्धतीचं छानसं डिझाईन काढू शकता.

चाफ्याची फुलं, विड्याची पानं यांचा रांगोळीमध्ये किती सुंदर उपयोग करता येतो पाहा.. त्याच्या जोडीला तर आकर्षक झेंडू आहेच..