Food Poisoning Causes :उन्हाळ्यात रोजच्या जेवणातील ४ पदार्थांमुळे होऊ शकतं फूड पॉयझनिंग, सावधान..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:04 PM2022-03-18T16:04:02+5:302022-03-18T16:42:33+5:30

Food Poisoning Causes : दूषित अन्नामध्ये जीवाणू, विषाणू आणि परजीवी असू शकतात ज्यामुळे अन्न विषबाधा होते.(food poisoning foods examples)

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी आहाराची योग्य निवड अत्यंत आवश्यक मानली जाते. (Health tips) निरोगी अन्न शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते, (Summer health tips) परंतु अन्नातील अशुद्धतेमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. (few tips to stay healthy this summer) विशेषत: सध्या तापमान वाढत असल्याने खाद्यपदार्थांच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

दूषित अन्नामध्ये जीवाणू, विषाणू आणि परजीवी असू शकतात ज्यामुळे अन्न विषबाधा होते.(food poisoning foods examples) अन्न शिजवताना किंवा हाताळताना घेतलेल्या निष्काळजीपणामुळेही ही समस्या उद्भवू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते, अन्न विषबाधामुळे मळमळ, उलट्या किंवा जुलाब यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. .(Food Poisoning Symptoms)

गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची देखील आवश्यकता असू शकते. नुकतेच अमेरिकन आहारतज्ञ कोरी एल. रॉड्रिग्ज यांनी सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, आपण रोज सेवन करत असलेल्या अनेक गोष्टी अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढवू शकतात. food poisoning Causes and preventions)

आपल्यापैकी बहुतेकजण दिवसाची सुरुवात मोड आलेल्या कडधान्यांनी करतात. अनेक प्रकारच्या अंकुरित आहाराचे हे मिश्रण आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की ते बनवताना घेतलेल्या निष्काळजीपणामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो? कडधान्य भिजवून त्यात अनेक प्रकारचे जीवाणू वाढू शकतात, त्यामुळे कडधान्य खाण्यापूर्वी ते अनेक वेळा चांगले धुण्यास विसरू नका.

बहुतेक घरांमध्ये भाताशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते, परंतु तुम्हाला हे माहित आहे का की यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो? आहारतज्ञ कोरी एल. रॉड्रिग्ज म्हणतात की, तांदूळ एकदा शिजवल्यानंतर अनेक तास न गरम करताच ठेवला जातो. ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. शिजवलेला भात जास्त वेळ बाहेर ठेवू नका. एकतर गरम खा किंवा शिजवल्यानंतर तासाभरात फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने तुम्ही अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी करू शकता.

आहारतज्ञांचे म्हणणे आहे की, मांस हे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढवणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. कमी शिजवलेले मांस खाल्ल्याने या समस्येचा धोका अनेक पटींनी वाढतो. मांसामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात, त्यामुळे जर ते योग्य प्रकारे न शिजवता खाल्ले तर ते अन्न विषबाधासह इतर अनेक समस्यांचा धोका वाढवू शकतो. फ्रोजन मांसामुळे हा धोका आणखी वाढतो. मांस स्वच्छ धुऊन शिजवल्यानंतर त्याचे सेवन करावे.

उन्हाळ्यात शरीरातील हायड्रेशन राखण्यासाठी कलिंगडाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. पण खरेदी करताना काळजी घ्या. चिरलेला कलिंगड जास्त वेळ ठेवू नका. यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.